शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमात हजारोच्या संख्येत सकल दिगंबर जैन समाजाचा मोर्चा !

By नंदकिशोर नारे | Updated: June 28, 2024 18:59 IST

वाशिम : जिल्ह्याच्या मालेगांव तालुक्यातील शिरपुर जैन येथील श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंताच्या मंदिरात असामाजिक तत्वांकडून हाेत असलेली दडपशाही बंद ...

वाशिम : जिल्ह्याच्या मालेगांव तालुक्यातील शिरपुर जैन येथील श्री अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंताच्या मंदिरात असामाजिक तत्वांकडून हाेत असलेली दडपशाही बंद करण्यासंदर्भात सकल दिगंबर जैन समाजाच्यावतीने शुक्रवारी हजारोंच्या उपस्थितीत भव्य मोर्चा काढण्यात आला. मोर्चात राज्यभरातून मोठ्या संख्येत आलेले सकल दिगंबर जैन समाजाचे बंधू भगिनी सहभागी झाले होते.

जिल्ह्यातील शिरपूर जैन नगरीत जैन धर्माचे २३ वें तीर्थंकर श्री अंतरीक्ष पार्श्वनाथ भगवंताचे मंदिर असून ते संपूर्ण जगात ख्यातीप्राप्त आहे.  सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तब्बल ४२ वर्षानंतर सन २०२३ मध्ये या मंदिराचे द्वार उघडले गेले आहेत. मात्र दोन पंथाच्या आपसी वादामुळे याठिकाणी कोणत्या न कोणत्या कारणावरून मारहाणीच्या घटना घडत आहे. अशातच काही असामाजिक तत्वांकडून दडपशाही केली जात आहे व पोलिस प्रशासन मंदिर कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्यासाठी वारंवार दबाव निर्माण करत असल्याचा आरोप करीत दिगंबर जैन समाजाच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवदेन देण्यात आले.

मोर्चाच्या प्रारंभी स्थानिक श्री बालासाहेब मंदिरासमोरील श्री चन्द्रप्रभू  खंडेलवाल दिगंबर जैन मंदिर येथे दिगंबर जैन मुनी श्री सिद्धांतसागर महाराज यांच्या नेतृत्वात सभा घेण्यात आली. ब्रम्हचारी तात्या नेजकर, राजा भैय्या पवार तथा अन्य मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.निवेदन देतेवेळी बा.ब्र. तात्या भैय्या, संजय जैन, धनंजय राेकडे, आकाश महाजन, आशिष डहाळे, रितेश महाजन, आनंद गडेकर, संताेष राेकडे, सुधिर भुरे आदिंसह मान्यवरांची उपस्थिती हाेती.