‘शौचालया’ची ९0 टक्के उद्दिष्टपूर्ती
By Admin | Updated: April 22, 2016 02:17 IST2016-04-22T02:17:40+5:302016-04-22T02:17:40+5:30
वाशिम जिल्ह्यात २२५00 शौचालयांचे बांधकाम पूर्ण: कारंजा तालुक्यात केवळ ६३ टक्के बांधकाम.

‘शौचालया’ची ९0 टक्के उद्दिष्टपूर्ती
वाशिम : गाव हगणदरीमुक्तीचा संकल्प घेऊन निघालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने २0१५-१६ या वर्षात ९0 टक्क्याच्या सरासरीने २५ हजार १0४ शौचालयांपैकी मार्च २0१६ अखेर २२ हजार ४७५ बांधकाम पूर्ण केले. २0१४-१५ या वर्षात उद्दिष्टापेक्षा जास्त शौचालय बांधकाम झाले होते, हे विशेष. स्वच्छ व सुंदर गावाची संकल्पना साकार करण्यासाठी स्वच्छता अभियान, निर्मल भारत अभियान राबविले जात आहे. २0१४ पासून सदर अभियान ह्यस्वच्छ भारत मिशनह्ण या नावाने राबविण्यात येत आहे. २0१४-१५ या वर्षात शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट १५ हजार ३७६ ठेवले होते. उद्दिष्टापेक्षा जास्त शौचालय बांधकाम करून राज्यात मानाचे स्थान मिळविले होते. २0१५-१६ या वर्षात जिल्ह्याला २५ हजार १0४ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट मिळाले होते. मार्च २0१६ अखेर २२ हजार ४७५ शौचालय बांधकाम पूर्ण झाले असून, याची टक्केवारी ८९.५२ येते. सर्वाधिक उद्दिष्ट कारंजा तालुक्याला १४ हजार ३४७ देण्यात आले होते. प्रत्यक्षात कारंजा तालुक्यात मार्चअखेर ९0५१ शौचालयांचे बांधकाम पूर्ण झाले असून, याची टक्केवारी ६३ येते. वाशिम तालुक्याला २२0६ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात २७८८ बांधकाम पूर्ण झाले. मालेगाव तालुक्यात २0६३ उद्दिष्ट असताना प्रत्यक्षात २५३८ शौचालय बांधकाम पूर्ण करण्यात आले. रिसोड तालुक्यात २२४८ उद्दिष्ट असताना २७१५ शौचालय बांधकाम पूर्ण झाले. मंगरुळपीर तालुक्यात २१९१ उद्दिष्ट असताना २८३८ बांधकाम पूर्ण झाले. मानोरा तालुक्यात २0८५ उद्दिष्ट असताना २५४५ शौचालय बांधकाम मार्चअखेर पूर्ण झाल्याची नोंद जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाच्या दप्तरी आहे. कारंजा तालुक्यावर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आले होते. नेमके कारंजा तालुक्यातच उद्दिष्टपूर्ती झाली नाही. अन्य तालुक्यात उद्दिष्टापेक्षा जास्त शौचालय बांधकाम झाले आहे. २0१६-१७ च्या कृती आराखड्याकडे लक्ष लागून आहे.