दूषित पाण्यामुळे ९0 जणांना अतिसाराची लागण

By Admin | Updated: May 20, 2016 01:49 IST2016-05-20T01:49:30+5:302016-05-20T01:49:30+5:30

मंगरूळपीर तालुक्यातील सार्सी येथील घटना : दह जणांची प्रकृती चिंताजनक

90 percent of diarrhea infections due to contaminated water | दूषित पाण्यामुळे ९0 जणांना अतिसाराची लागण

दूषित पाण्यामुळे ९0 जणांना अतिसाराची लागण

मंगरुळपीर : तालुक्यातील सार्सी बोध येथे दूषित पाण्यामुळे ९0 जणांना अतिसाराची लागण झाली असून, यापैकी १0 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे कळले आहे. यापैकी काही रुग्णांना वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले, तर काहींना आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
मंगरुळपीर तालुक्यातील सार्सी येथे लग्न समारंभात अन्न व दूषित पाणी पिण्यात आल्यामुळे वृद्ध, लहान बालके मिळून जवळपास ९0 रुग्णांना अतिसाराची बाधा झाली आहे. यातील ३८ रुग्णांना त्याच दिवशी १७ मे रोजी बाधा झाली. त्यांना आसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, तर त्यानंतर दुसर्‍या दिवशी आणखी जवळपास ५0 रुग्णांना उलट्या व मळमळीचा त्नास सुरू झाला. त्यामुळे त्यांना धानोरा येथे उपचारासाठी हलविण्यात आले, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन गावात आरोग्य पथक दाखल झाले आणि या पथकाने गावातच रुग्णांवर उपचार सुरू केले. तसेच घरोघरी जाऊन तपासणी केली. यातील चार रुग्णांची प्रकृती खालावल्याने त्या रुग्णांना तातडीने वाशिम येथे हलविण्यात आले. दरम्यान, एकाच वेळी ९0 लोकांना अतिसाराची लागण झाल्यामुळे आरोग्य विभागाच्यावतीने गावातील जलस्रोतातील पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी जिल्हा स्तरावर पाठविण्यात आले.

Web Title: 90 percent of diarrhea infections due to contaminated water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.