९७ गावांना टँंकरने पाणी पुरवठा
By Admin | Updated: June 4, 2016 02:45 IST2016-06-04T02:45:43+5:302016-06-04T02:45:43+5:30
वाशिम जिल्हा प्रशासनाच्यावतीने ५ कोटी ६८ लाख ३४ हजार रुपये अपेक्षित खर्चाचा कृती आराखडा तयार.

९७ गावांना टँंकरने पाणी पुरवठा
वाशिम: जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ५ कोटी ६८ लाख ३४ हजार रुपये अपेक्षित खर्चाचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार २ जून २0१६ अखेर जिल्ह्यात ९७ गावांना टँकरने पाणी पुरवठा सुरू असून, २४७ गावांसाठी ३२८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करून पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
जिल्ह्यात गतवर्षी आतापयर्ंत ४८७ उपाययोजना राबविण्यास मंजुरी देण्यात आली असून, यामध्ये ५१ गावांमध्ये ५४ विंधन विहिरी घेणे, ९ गावांमधील नळ योजनांची दुरुस्ती करणे, ९७ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा करणे व २४७ गावांमध्ये ३२८ खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे आदी उपाययोजनांचा समावेश आहे. यापैकी ६३ गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला असून खासगी विहीर अधिग्रहणाची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. तसेच ३६ गावांमधील नळ योजनांची दुरुस्तीही पूर्ण झाली आहे.
वाशिम तालुक्यातील १९, मालेगाव तालुक्यातील १९, रिसोड तालुक्यातील ८, मंगरुळपीर तालुक्यातील २२, मानोरा तालुक्यातील १२ व कारंजा तालुक्यातील १७ गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. तसेच वाशिम तालुक्यातील ५५ गावांमधील ७९, मालेगाव तालुक्यातील ५0 गावांमधील ६१, रिसोड तालुक्यातील ४0 गावांमधील ६१, मंगरुळपीर तालुक्यातील ४६ गावांमधील ५६, मानोरा तालुक्यातील १२ गावांमधील १७ व कारंजा तालुक्यातील ४४ गावांमधील ५४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.