शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

वाशिम  जिल्ह्यात १८ दिवसांत ८९ कोटींचे पीककर्ज वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 17:58 IST

वाशिम : जिल्ह्यात पीककर्ज वितरणाच्या प्रक्रियेला वेग आला असून, या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या ७८४७ शेतकऱ्यांना १८ दिवसांत ८९.२६ लाख रुपयांच्या पीककर्जाचे वितरण विविध बँकांनी केले आहे. यामध्ये अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक आघाडीवर आहे. यंदा वाशिम जिल्ह्यात  १,४७५ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.  गतवर्षी अर्थात २०१६ च्या खरीप ...

ठळक मुद्देअवघ्या ७८४७ शेतकऱ्यांना १८ दिवसांत ८९.२६ लाख रुपयांच्या पीककर्जाचे वितरण विविध बँकांनी केले आहे.अद्यापही पीककर्जाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम असून, कर्जमाफीच्या निकषाने हा गोंधळ उडत आहे.

वाशिम : जिल्ह्यात पीककर्ज वितरणाच्या प्रक्रियेला वेग आला असून, या प्रक्रियेला सुरुवात झाल्यानंतर अवघ्या ७८४७ शेतकऱ्यांना १८ दिवसांत ८९.२६ लाख रुपयांच्या पीककर्जाचे वितरण विविध बँकांनी केले आहे. यामध्ये अकोला जिल्हा मध्यवर्ती बँक आघाडीवर आहे. यंदा वाशिम जिल्ह्यात  १,४७५ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.  गतवर्षी अर्थात २०१६ च्या खरीप हंगामामध्ये प्रशासनाने ९५० कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट बाळगले होते. त्यापैकी अंतीम मुदतीपर्यंत प्रत्यक्षात ८९० कोटी रुपये वाटप झाला होता. २०१७ च्या खरीप हंगामात मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १,१५० कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी अंतीम मुदतीपर्यंत अर्थात १५ जुलै २०१७ पर्यंत केवळ ३१० कोटी रुपयेच (२७ टक्के) कर्ज वाटप झाले होते. कर्जमाफी मिळण्याच्या अपेक्षेने जिल्ह्यातील थकबाकीदार असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील कर्ज अदा केले नव्हते. त्यामुळे त्यांना नव्याने कर्ज मिळू शकले नाही, हे त्यामागील प्रमुख कारण होते. यंदाा राज्यशासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत दीड लाखांपर्यंत कर्ज असणाºयाा सर्व शेतकऱ्यांचे कर्जमाफी माफ केले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी सद्या कर्जमुक्त झाले आहेत. दरम्यान, अद्यापही पीककर्जाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम असून, कर्जमाफीच्या निकषाने हा गोंधळ उडत आहे. या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशनुसार जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय नगराळे यांनी बँकांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना पीककर्ज वितरण आणि पीककर्ज माफीबाबत शेतकºयांना विस्तृत मार्गदर्शन करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानंतर जिल्ह्यात पीककर्ज वितरण प्रक्रियेने वेग घेतला आहे. या अंतर्गत गत १८ दिवसांतच जिल्ह्यातील ७८४७ शेतकऱ्यांना ८९.२६ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरीत करण्यात आले. जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून सर्वाधिक वितरणवाशिम जिल्ह्यात यंदा  १,४७५ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दीष्ट ठेवण्यात आल्यानंतर पीककर्ज वितरण प्रक्रियेला सर्वप्रथम जिल्हा मध्यवर्ती बॅकेने सुरुवात केली. जिल्ह्यात १८ दिवसांत ७८४७ शेतकºयांना ८९.२६ कोटींचे कर्ज वितरीत करण्यात आले असले तरी, यात सर्वाधिक वाटा हा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आहे. या बँकेच्यावतीने एकट्या वाशिम तालुक्यात १४८५ शेतकऱ्यांना १३.५६ कोटी रुपयांचे पीककर्ज वितरीत करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती