८७ हजाराचे दागिणे लंपास

By Admin | Updated: January 24, 2017 02:22 IST2017-01-24T02:22:17+5:302017-01-24T02:22:17+5:30

शेगाव येथील आनंदसागर विसावा येथील घटना.

87 thousand jewelery lamps | ८७ हजाराचे दागिणे लंपास

८७ हजाराचे दागिणे लंपास

शेगाव, दि. २३- शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या आनंद सागर विसावा येथे अज्ञात चोरट्याने भाविकांच्या खिशातून सोन्याचे दागिने, मोबाइल व रोख रक्कम असा ८७ हजाराचा ऐवज लंपास केला. ही घटना सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. प्रल्हाद रामकिसन जाधव वय ४२ रा.विठ्ठलवाडी, मुंबई हे सोमवारी सकाळी आंघोळीला गेले असता, अज्ञात चोरट्याने त्यांच्या पँटमधून सोन्याची एकदानी, गहुपोत एकूण वजन २९ ग्रॅम किंमत ७९ हजार, असा एकूण ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

Web Title: 87 thousand jewelery lamps