तुरीचे ८५.७३ कोटींचे चुकारे प्रलंबित!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:41 IST2017-09-12T01:40:42+5:302017-09-12T01:41:09+5:30
वाशिम: बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत २६ जुलै ते ३१ ऑगस्ट पर्यंत टोकनधारक १0 हजार ९५ शेतकर्यांची एक लाख ६९ हजार ७८0 क्विंटल तूर हमीभावात खरेदी करण्यात आली. तुरीच्या चुकार्यापोटी ८५ कोटी ७३ लाख रुपये अद्याप मिळाले नाहीत. तूर विकूनही पैसा मिळत नसल्याने शे तकर्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

तुरीचे ८५.७३ कोटींचे चुकारे प्रलंबित!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत २६ जुलै ते ३१ ऑगस्ट पर्यंत टोकनधारक १0 हजार ९५ शेतकर्यांची एक लाख ६९ हजार ७८0 क्विंटल तूर हमीभावात खरेदी करण्यात आली. तुरीच्या चुकार्यापोटी ८५ कोटी ७३ लाख रुपये अद्याप मिळाले नाहीत. तूर विकूनही पैसा मिळत नसल्याने शे तकर्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
गतवर्षी तुरीचे उत्पादन बर्यापैकी झाले; मात्र बाजारभाव नसल्याने शेतकर्यांच्या पदरी निराशाच पडली. नाफेड केंद्रावर तुरीला हमीभाव मिळाल्याने बहुतांश शेतकर्यांनी तूर विक्रीसाठी नाफेड केंद्रांवर गर्दी केली होती. मध्यंतरी शासनाने नाफेड केंद्रांवरील तुरीची खरेदी बंद केली होती. त्यानंतर पुन्हा ३१ मेपर्यंत तूर खरेदी करण्यात आली. ३१ मे पर्यंत टोकन घेतलेल्या शेतकर्यांची हजारो क्विंटल तुरीची मोजणी झाली नव्हती. तुरीची खरेदी करण्याची मागणी विविध स्तरातून समोर आल्याने राज्य शासनाने पुन्हा २२ जुलै ते ३१ ऑगस्ट या दरम्यान बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत टोकनधारक शेतकर्यांची तूर खरेदी करण्याचा निर्णय घे तला. त्यानुसार वाशिम जिल्हय़ात २६ जुलैपासून हमीभावाने तूर खरेदीला सुरुवात झाली. २६ जुलै ते ३१ ऑगस्ट या दरम्यान १0 हजार ९५ शेतकर्यांची एक लाख ६९ हजार ७८0 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली. या शेतकर्यांना चुकार्यापोटी ८५ कोटी ७३ लाख ८९ हजार रुपये मिळणे अ पेक्षित होते. अद्याप चुकारे मिळाले नसल्याने शेतकर्यांचे ‘बजेट’ कोलमडत असल्याचे दिसून येते. आता सोयाबीन सोंगणी व काढणीचा हंगाम जवळ येत आहे. याशिवाय पर तीचा पाऊस दमदार झाला तर रब्बी हंगामात पेरणीचे नियोजन करावे लागणार आहे. अशा परिस्थितीत तुरी विक्री केल्यानंतरही पैसे मिळत नसल्याने शेतकर्यांमधून रोष व्यक्त होत आहे. वाशिम बाजार समितीतील २४६८ शेतकरी, अनसिंग बाजार समितीतील १00६ शेतकरी, मालेगाव बाजार समितीतील ९८८ शेतकरी, मंगरूळपीर बाजार समि तीतील २३६0, कारंजा बाजार समितीतील २६१४, रिसोड बाजार समितीतील ६५९ अशा एकूण १0 हजार ९५ शे तकर्यांनी २६ जुलै ते ३१ ऑगस्ट २0१७ दरम्यान एक लाख ६९ हजार ७८0 क्विंटल तूर विक्री केली आहे. अद्याप पैसे मिळाले नसल्याने शेतकर्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या तुरीचे चुकारे शेतकर्यांना मिळावे यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. अद्याप रक्कम प्राप्त नाही. चुकार्याची रक्कम मिळताच शेतकर्यांना वितरित करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या जातील.
- रमेश कटके
जिल्हा उपनिबंधक, वाशिम.
बाजार हस्तक्षेप योजनेंतर्गत तूर विक्री केल्यानंतरही शे तकर्यांना चुकार्याची रक्कम मिळत नाही, ही बाब गंभीर आहे. यावर्षी निसर्गाची साथ मिळत नसल्याने किमान शासनाने तरी शेतकर्यांना साथ देऊन दिलासा देणे अपेक्षित आहे. चुकारे मिळण्यासंदर्भात शासनाला निवेदन दिले आहे. येत्या दहा दिवसात चुकार्याची रक्कम न मिळाल्यास शे तकर्यांसह जिल्हाभर आंदोलन उभारले जाईल.
- चंद्रकांत ठाकरे
उपाध्यक्ष जि.प. वाशिम तथा सभापती, बाजार समिती, मंगरूळपीर