८५ हजाराचा गुटखा जप्त

By Admin | Updated: May 25, 2017 19:54 IST2017-05-25T19:54:51+5:302017-05-25T19:54:51+5:30

वाशिम - जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने कारंजा शहरातील गुटखा माफियाच्या प्रतिष्ठानावर छापा टाकून ८५ हजाराचा गुटखा जप्त केल्याची कारवाई २४ मे रोजीच्या मध्यरात्रीदरम्यान केली.

85 thousand gutkha seized | ८५ हजाराचा गुटखा जप्त

८५ हजाराचा गुटखा जप्त

ऑनलाइन लोकमत
वाशिम - जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने कारंजा शहरातील गुटखा माफियाच्या प्रतिष्ठानावर छापा टाकून ८५ हजाराचा गुटखा जप्त केल्याची कारवाई २४ मे रोजीच्या मध्यरात्रीदरम्यान केली.
पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांना मिळालेल्या माहितीवरून कारंजा शहरातील गुटखा माफिया मोहम्म फिरोज मो. सिद्धीकी याच्या शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या एम.एस. ट्रेडर्स या प्रतिष्ठानावर विशेष पथकाने छापा मारला. यावेळी शासनाने बंदी घातलेला तत्सम साठा आढळून आला. गुटखा, प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ, सुगंधित सुपारी व तत्सम तंबाखू मिश्रीत पदार्थ असा एकूण ८५ हजार ९२० रुपयाचा माल जप्त करण्यात आला तसेच मो. फिरोज मो. सिद्धिकी याच्याविरूद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आली. सदर कारवाई पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक किरण साळवे, पोलीस उपनिरीक्षक इंगळे, कर्मचारी लक्ष्मण कोल्हे, रामेश्वर जगताप, प्रदीप चव्हाण, प्रेमदास आडे, रवी घरत, बालाजी बर्वे, अन्न सुरक्षा अधिकारी यादव यांनी पार पाडली.

Web Title: 85 thousand gutkha seized