वाशिम व मंगरुळपीर शहरातील ८0 टक्के कामगार अशिक्षितच!
By Admin | Updated: September 16, 2016 03:03 IST2016-09-16T03:03:05+5:302016-09-16T03:03:05+5:30
दुकान निरीक्षक विभागाची माहिती.

वाशिम व मंगरुळपीर शहरातील ८0 टक्के कामगार अशिक्षितच!
शिखरचंद बागरेचा
वाशिम, दि. १५- जिल्ह्यातील वाशिम व मंगरुळपीर शहरातील विविध व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये सुमारे चार हजार कामगार कामावर तत्पर असून, यापैकी तब्बल ८0 टक्के कामगार अशिक्षित असल्याची माहिती दुकान निरीक्षक विभागाचे वरिष्ठ लिपिक ए.एस.धनगर यांनी दिली.
कामगार शिक्षण दिनानिमित्त दुकाने निरीक्षक विभागाकडून कामगाराच्या शिक्षणाबाबत माहिती घेताना ८0 टक्के कामगार अशिक्षित असल्याची बाब निदर्शनास आली.
कुशल, अकुशल व अर्धकुशल यातील ङ्म्रेणीमध्ये मोडणार्या कामगार वर्गामध्ये वाशिम व मंगरूळपीर शहरात चार हजार एकशे चोविस एकूण कामगार विविध व्यवसाय व प्रतिष्ठांनामध्ये कार्यरत असल्याची नोंद संबंधित विभागाकडे असून, पाच टक्के कामगार अर्धकुशल तर पंधरा टक्के कामगार कुशल असल्याची माहिती देण्यात आली.
तब्बल ८0 टक्के कामगार कुशल असल्याची माहिती संबंधित विभागाकडून मिळाली असून, ही आकडेवारी दुकाने निरीक्षक विभागाकडे नोंद आहे. बाल कामगार कायद्यान्वये धोकादायक आस्थापनामध्ये कामावर असलेले बाल कामगार शोध पत्रिकाद्वारे शोधून कार्यवाही करून त्यांना शिक्षित करण्याचे कामसुद्धा केले जाते. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी शासन विविध संस्थांवर सोपवित असते, अशी माहिती धनगर यांनी यावेळी दिली.