रिसोड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत ७६.६२ टक्के मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:45 IST2021-01-16T04:45:25+5:302021-01-16T04:45:25+5:30
रिसोड : तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारीला मतदान शांततापूर्ण वातावरणात निवडणूक पार पडली. सकाळपासूनच विविध मतदान केंद्रावर मतदारांची रांगा ...

रिसोड तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत ७६.६२ टक्के मतदान
रिसोड : तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतीसाठी १५ जानेवारीला मतदान शांततापूर्ण वातावरणात निवडणूक पार पडली. सकाळपासूनच विविध मतदान केंद्रावर मतदारांची रांगा लागणे सुरू झाले होते. या दरम्यान मतदारांत चांगलाच उत्साह दिसून आला. यावेंळी उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच धावपळ दिसून आली. मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.
सुरुवातीला रिसोड तालुक्यातील ३४ ग्रामपंचायती करिता मतदानाची घोषणा झाली होती.मात्र तालुक्यातील मोप व कंकरवाडी या ग्रामपंचायती अविरोध झाल्याने ३२ ग्रामपंचायती करिता आज मतदान झाले. मतदान करणाऱ्या मध्ये वयोवृद्ध मतदार पासून युवका पर्यंत चांगलाच उत्साह दिसून आला. वयोवृद्ध मतदारांना युवकांनी उचलून मतदान केंद्रापर्यंत पोहोचले तर अपंगांना व्हीलचेअरवर बसून मतदान करण्यासाठी केंद्रापर्यंत सोडण्यात आले. आमदार अमित झनक यांनी आपले मूळगाव मांगुळ झनक येथे आपल्या मतदानाचा अधिकार बजावला तर जिल्हा परिषद सदस्य, पंचायू समिती सदस्य, खरेदी-विक्री संघाचे सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य यांनी आपापल्या गावी मतदानाचा हक्क बजावला यावेळी झालेली ही निवडणूक खूपच रंगतदार झाली असल्याची चर्चा मतदारांमध्ये दिसून आली. तालुक्यातील नावली,नंधाना, गोभणी,मांगुळ झनक, नेतन्सा, कवठा, खू , चिखली, चिचांबा पेन, गोवर्धन, केशवनगर, शेलु खडसे,लोणी बू, चिचांबा भर,मसलापेन,सवड, करडा,केनवड, बिबखेड, पळसखेड, आगरवाडी, वाकद, मोठेगाव, गौंढाळा, ऐकलासपुर,खडकी सदार, येवती, रिठद,व्याड, करंजी, वनोजा, देऊळगाव बंडा, हराळ, या गावात निवडणूक झाली. काही ठिकाणी किरकोळ वाद सोडता निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.