पोहरादेवीत उभारले जाणार ७५ लाखांचे डोम सभागृह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:28 IST2021-06-24T04:28:00+5:302021-06-24T04:28:00+5:30

ग्रामीण भागात गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सन २०२०-२१ या वित्तीय वर्षात पोहरादेवीत डोम सभागृह मंजूर करण्यात आले. येथील संत ...

75 lakh dome hall to be built in Pohardevi | पोहरादेवीत उभारले जाणार ७५ लाखांचे डोम सभागृह

पोहरादेवीत उभारले जाणार ७५ लाखांचे डोम सभागृह

ग्रामीण भागात गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सन २०२०-२१ या वित्तीय वर्षात पोहरादेवीत डोम सभागृह मंजूर करण्यात आले. येथील संत बाबनलाल महाराज महाशक्तीपीठ संस्थानच्या खुल्या जागेवर ७५ लाख रुपये खर्चून ते उभारण्यात येणार आहे. ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे कार्यासन अधिकारी अभिजित तेलवेकर यांनी यासंदर्भात जिल्हा परिषद, वाशिम यांना कळविले आहे.

...................

माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार संजय राठोड यांनी पोहरादेवी येथील बाबनलाल महाराज मंदिरासमोर ७५ लाख रुपयांचे डोम सभागृह होण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. शासनाने हा निधी मंजूर केला असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. या सभागृहामुळे पोहरादेवी येथे यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या निवासाचा प्रश्न निकाली निघणार आहे.

महंत सुनील महाराज

सचिव, मंदिर ट्रस्ट, पोहरादेवी

Web Title: 75 lakh dome hall to be built in Pohardevi