७ वर्षीय शाश्वतीने राहुल गांधींना विचारलं...'तुमचे पाय नाहीत का दुखत?, राहुल म्हणाले... 

By नंदकिशोर नारे | Updated: November 16, 2022 11:57 IST2022-11-16T11:56:20+5:302022-11-16T11:57:58+5:30

स्मित हास्य देत राहुलजींनी 'नहीं हमारे पैर नहीं दुखते' असे, उत्तर दिले.

7 year old Shashwati asked Rahul Gandhi Dont your legs hurt | ७ वर्षीय शाश्वतीने राहुल गांधींना विचारलं...'तुमचे पाय नाहीत का दुखत?, राहुल म्हणाले... 

७ वर्षीय शाश्वतीने राहुल गांधींना विचारलं...'तुमचे पाय नाहीत का दुखत?, राहुल म्हणाले... 

वाशिम :

येथून १६ नोव्हेंबर रोजी निघालेल्या भारत जोडो पदयात्रेत एक ७ वर्षीय चिमुकली शाश्वती इंगोले आपल्या वडिलांसोबत सहभागी झाली होती. यावेळी तिने, चक्क खासदार राहुल गांधी यांना आपले पाय दुखत नाहीत का? असा प्रश्न केला. त्यावर स्मित हास्य देत राहुलजींनी 'नहीं हमारे पैर नहीं दुखते' असे, उत्तर दिले. त्या नंतरही तिने पुन्हा तुमची आई तुम्हाला रागवत नाही का याची विचारणा केली. यावर त्यांनी 'गलती करने के बाद तो मम्मी डाटेंगी', असे उत्तर देऊन तिला एक चॉकलेट देऊन कौतुक केले.

चॉकलेट दिल्यानंतरही आपल्या आजी आणि वडिलांना आतंकवादिनी मारले तरी सुद्धा आपण बिनधास्त फिरताय त्यावर राहुलजींनी ' हम किसीसे नही डरते' असे उत्तर दिले. यावेळी राहुलजींना प्रश्न करणाऱ्या शाश्वती चे कौतूक करण्यात आले.

Web Title: 7 year old Shashwati asked Rahul Gandhi Dont your legs hurt