६८ प्रकल्पांनी गाठला तळ!
By Admin | Updated: April 8, 2016 02:04 IST2016-04-08T02:04:37+5:302016-04-08T02:04:37+5:30
वाशिम जिल्ह्यावर भीषण पाणीटंचाईचे संकट: उपाययोजनांची परिणामकारक अंमलबजावणी होणे अत्यावश्यक.

६८ प्रकल्पांनी गाठला तळ!
वाशिम : गतवर्षी घटलेले पर्जन्यमान तथा यावर्षी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या उन्हाच्या दाहकतेमुळे १0७ लघूप्रकल्पांपैकी तब्बल ६८ प्रकल्प कोरडेठाण्ण पडले असून ३ मध्यम प्रकल्पांपैकी मालेगाव तालुक्यातील सोनल प्रकल्पाची पाणीपातळी शून्यावर गेली आहे. परिणामी, जिल्ह्यावर कधी नव्हे; ते यंदा भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून त्यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या उपाययोजनांची परिणामकारक अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा जनतेतून व्यक्त होत आहे. .................................. शेतकर्यांवर अस्मानीसोबतच सुलतानी संकट वाशिम जिल्ह्यात कृषिपंप जोडणीचे ७१६२ अर्ज प्रलंबित: शेतकरी कृषीपंप जोडणीच्या प्रतीक्षेत वाशिम : सातत्याने निसर्गाच्या लहरीपणामुळे पडत असलेला दुष्काळ त्यातच महावितरण कृषीपंपाकरिता वीज जोडणी देण्यास करीत असलेला विलंब, यामुळे शेतकरी अस्मानी व सुलतानी या दोन्ही संकटात सापडला आहे. मार्च २0१६ अखेर जिल्ह्यातील सात हजार कृषी पंप जोडणीचे अर्ज महाविरणकडे प्रलंबित आहेत.