६,७00 परवान्यांची विक्री दारु दुकानांतून
By Admin | Updated: January 2, 2015 01:01 IST2015-01-02T01:01:57+5:302015-01-02T01:01:57+5:30
ढाब्यांवर युवकांची गर्दी : महसुलात वाढ.

६,७00 परवान्यांची विक्री दारु दुकानांतून
वाशिम : जिल्हयातील हजारो लोकांनी मद्यप्राशन करुन नववर्षाचे स्वागत जल्लोशात केले. मद्यप्राशन करण्याचे सुमारे ६७00 परवाने अबकारी विभागाने मद्यविक्री केंद्रातून उपलब्ध करुन दिले. नववर्षाचे स्वागत करताना हजारो लोकांनी मद्य खरेदी करतात. ही बाब देउन अबकारी विभागाने एक दिवशीय मद्यप्राशन करण्याचा परवाने मद्यविक्री केंद्रातच उपलब्ध करुन दिले होते. बीयरबार, देशी विदेशी दारु विक्रीची दुकाने, वाईनबार संचालकांना ग्राहकांसाठी परवाने देण्यात आले. १८ वर्षावरील सर्वांंंंना हे परवाने घेणे बंधनकारक करण्यात आल्याने नववर्ष स्वागतात्सुक नागरिकांनी कायद्याचा आदर करीत मद्यासोबतच परवान्यांची खरेदी केली. इतर वेळेस वर्षातील ३६0 दिवस एक दिवसीय परवाने कोणीही मागत नसताना नववर्षाच्या पुर्वसंध्येला चक्क सहा हजार सातशे परवान्यांची विक्री होऊन अबकारी विभागाचा महसूल वाढला. ढाब्यांवर युवकांची गर्दी मोठया प्रमाणात दिसून आली.