शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील ६३ हजार विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 12:18 IST

Washim News ६३ हजार १७० विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक शालेय गणवेश लवकरच मोफत मिळणार आहे.

ठळक मुद्दे १ कोटी ७० लाख ७० हजाराचा निधीही मिळाला आहे.शाळा व्यवस्थापन समितीकडे निधी वितरण केले जाणार आहे.  

 लाेकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या पात्र ६३ हजार १७० विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक शालेय गणवेश लवकरच मोफत मिळणार आहे. यासाठी शासनाकडून पहिल्या टप्प्यात १ कोटी ७० लाख ७० हजाराचा निधीही मिळाला आहे.विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे, मागासवर्गीय व गोरगरीब विद्यार्थ्यांना दिलासा म्हणून समग्र शिक्षा अभियानातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीतील पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन मोफत गणवेश दिले जातात. यंदा कोरोनामुळे राज्यासमोर आर्थिक संकट उभे ठाकल्याने पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश दिला जाणार आहे. एका गणवेशासाठी ३०० रुपये याप्रमाणे  शासनाकडून जिल्ह्याला निधी मिळाला आहे. जिल्हास्तर व पंचायत समिती स्तरावरून शाळा व्यवस्थापन समितीकडे निधी वितरण केले जाणार आहे.   

जिल्हा परिषदेला १.७० कोटींचा निधी मिळालासमग्र शिक्षा अभियानांतर्गत पहिली ते आठवीच्या पात्र विद्यार्थ्यांना दोन गणवेश दिले जातात. यंदा एका गणवेशासाठी जिल्हा परिषदेला एक कोटी ७० लाख ७० हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. हा निधी शाळा व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. व्यवस्थापन समित्या गणवेश खरेदी करतील.

समग्र शिक्षा अभियानातून पात्र विद्यार्थ्यांना प्रती दोन गणवेश दिले जातात. यंदा एका गणवेशासाठी शिक्षण विभागाला १.७० कोटींचा निधी प्राप्त झाला. हा निधी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत शाळा व्यवस्थापन समितीला दिला जाइल. गणवेशाचे घरपोच वितरण केले जाणार आहे.- अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळाStudentविद्यार्थी