जिल्हा बँक निवडणुकीत मानोरा तालुक्यातून ६ अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:19 IST2021-01-24T04:19:51+5:302021-01-24T04:19:51+5:30

२५ जानेवारीला दाखल अर्जांची छाननी २७ जानेवारीला हाेईल, २७ जानेवारी ते १० फेब्रुवारी अर्ज मागे घेणे, ११ फेब्रुवारी निशाणी ...

6 applications filed from Manora taluka in district bank election | जिल्हा बँक निवडणुकीत मानोरा तालुक्यातून ६ अर्ज दाखल

जिल्हा बँक निवडणुकीत मानोरा तालुक्यातून ६ अर्ज दाखल

२५ जानेवारीला दाखल अर्जांची छाननी २७ जानेवारीला हाेईल, २७ जानेवारी ते १० फेब्रुवारी अर्ज मागे घेणे, ११ फेब्रुवारी निशाणी (चिन्ह) वाटप, २० फेब्रुवारीला मतदान व २१ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. मानोरा शाखा संचालक पदासाठी ६ उमेदवार यांनी अर्ज दाखल केले. त्यामध्ये भाजप समर्थित विद्यमान संचालक उमेश ठाकरे, माजी आ. सुभाष ठाकरे गटाकडून पंचायत समितीचे माजी उपसभापती अभिजीत पाटील, बाजार समितीचे संचालक तुषार इंगोले, सुरेश चौधरी, माजी आ. प्रकाश डहाके गटाकडून बँकेचे माजी संचालक सुरेश गावंडे, बाजार समितीचे माजी सभापती अशोकराव देशमुख यांनी अर्ज दाखल केले आहे. यापैकी कोण अर्ज मागे घेणार व कोणते उमेदवार कायम राहणार याकडे सहकार क्षेत्र, राजकीय पुढारी यांचे लक्ष लागले आहे.

आपल्याच गटाचा, पक्षाचा संचालक निवडून आला पाहिजे याकरिता आ. राजेंद्र पाटणी, माजी मंत्री सुभाष ठाकरे, माजी आ. प्रकाश डहाके, मोर्चेबांधणी करीत आहेत. मानोरा तालुक्यात एकूण ३४ मतदार आहेत.

Web Title: 6 applications filed from Manora taluka in district bank election