एटीएममधून ५५ हजार काढून फसवणूक

By Admin | Updated: May 15, 2015 00:38 IST2015-05-15T00:38:51+5:302015-05-15T00:38:51+5:30

वाशिम येथील घटना.

55,000 frauds removed from ATM | एटीएममधून ५५ हजार काढून फसवणूक

एटीएममधून ५५ हजार काढून फसवणूक

वाशिम : हातचलाखीने एटीएम कार्ड बदलून नंतर त्यातून ५५ हजार रुपये काढल्याची घटना लाखाळा रस्त्यावरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ट्रेझरी शाखा एटीएमजवळ १३ मे रोजी १ वा. ५0 मिनिटादरम्यान घडली. कनेरगाव येथील रहिवासी विनोदकुमार दत्तराव गावंडे त्यांचे मित्र अनिल पंढरीनाथ झुंझारे वाशिम येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ट्रेझरी शाखेतून पैसे काढत असताना अडचणी येत असल्याचे पाहून तेथे उपस्थित एका अज्ञात इसमाने दाखवा मी पैसे काढून देतो, असे सांगितले. अज्ञात इसमाने गावंडे यांना त्यांचा पासवर्ड विचारुन पैसे काढून दिले. पैसे काढून दिल्यानंतर एटीएम कार्डसुद्धा परत दिले; परंतु जे एटीएम कार्ड परत दिले ते त्यांचे नव्हते. गावंडे यांनी एटीएम कार्ड न पाहता खिशात टाकून दिले; मात्र दुसर्‍या दिवशी १४ मे रोजी गावंडे यांच्या मोबाइलवर ५५ हजार रुपये काढल्याचा बँकेचा मॅसेज आला तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. गावंडे यांनी वाशिम पोलिसांत याबाबत रितसर तक्रार दाखल केली. गावंडे यांच्या तक्रारीवरुन शहर पोलीस स्टेशनने अज्ञात आरोपिविरुद्ध कलम ४0६, ४२0 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलिसांच्यावतीने करण्यात येत आहे.

Web Title: 55,000 frauds removed from ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.