पक्ष्यांसाठी ५०० पानवठे बसविण्याचे कार्य पूर्ण!
By Admin | Updated: April 3, 2017 13:31 IST2017-04-03T13:31:58+5:302017-04-03T13:31:58+5:30
पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करुन ५०० पानवठे (वॉटर फिडर्स फॉर बर्डस)बसविण्याचा संकल्प करण्यात आला होता.

पक्ष्यांसाठी ५०० पानवठे बसविण्याचे कार्य पूर्ण!
वाशिम : स्थानिक सावली प्रतिष्ठान या निसर्ग व्यासंगी गृपच्यावतिने शहरांमध्ये निर्जळ व जास्त झाडे असलेल्या ठिकाणी पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करुन ५०० पानवठे (वॉटर फिडर्स फॉर बर्डस) शहरातील व उपनगरातील विविध ठिकाणी २० मार्च या जागतिक चिमणी दिवसाच्या पार्श्वभूमिवर टप्प्याटप्प्याने बसविण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यानुसार उन्हातान्हात फिरुन या गृपच्या प्रत्येक सदस्याने जागोगागी पाणवठे उभारुन ५०० चा आकडा ओलांडला आहे. तरीही ते न थांबता त्यांचे कार्य सुरुच आहे.
सदर उपक्रम राबविण्यासाठी सावली प्रतिष्ठानचे संयोजक राम धनगर, वैभव गौरकर, सुनिल हेंद्रे, रुपेश काबरा, अजय यादव, रुपाली धनगर, रोहीदास धनगर, ऋषाली बाभणे, प्रविण होनमने, रेश्मी मोहटे, निखिल मोहटे, पंकज गाडेकर, पवन गाडेकर, शिवम मुंदडा, निखिल पखाले, अक्षय राठोड, बंडु गव्हाणे, प्रदिप नवघरे, ज्ञानेश्वर नवघरे, मारोती गजभार, शंकर कालापाड, सागर बदामकर, संदिप इंगळे, विकेश डोंगरे, गजानन खंडारे, आदित्य बोडखे, प्रविण इंगोले, अक्षय कालापाड, ऋषिकेश बाभणे, शांतीलाल शिंदे असे अनेक सदस्य आपल्या वेळातील वेळ काढून साहित्य निर्मितीसाठी परिश्रम घेत आहेत.