शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात अल्पशा पावसावर आटोपल्या ५० टक्के पेरण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 15:04 IST

अल्पशा पावसावरच जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांनी खरीपातील पेरण्या आटोपल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : दरवर्षीच्या पावसाळ्यात १ ते २९ जून या कालावधीत जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये सरासरी १५८.५२ मिलीमिटर पाऊस कोसळतो. यंदा मात्र तुलनेने उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे हे प्रमाण केवळ ९१.३६ मिलीमिटर असून लघू आणि मध्यम अशा १३४ पैकी शंभरावर सिंचन प्रकल्प अद्याप कोरडेच आहेत. दुसरीकडे अल्पशा पावसावरच जिल्ह्यातील सुमारे ५० टक्के शेतकऱ्यांनी खरीपातील पेरण्या आटोपल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत सरासरी ७९८.७० मिलीमिटर पाऊस कोसळतो. १ ते २९ जून या कालावधीत ही सरासरी १५८.५२ मिलीमिटर असते. यंदा मात्र चालू महिन्यात वाशिम तालुक्यात १००.७६, मालेगाव ९३.५६, रिसोड ८८.३, मंगरूळपीर ९१.८५, मानोरा ६९.७० आणि कारंजा तालुक्यात १०४.२३ असा सरासरी ९१.३६ मिलीमिटर पाऊस कोसळला आहे. त्याची टक्केवारी ११.४४ असून पावसाच्या पहिल्याच महिन्यात पर्जन्यमान ६७ मिलीमिटरने घटल्याचे दिसून येत आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणचे नदी-नाले, विहिरी, कुपनलिका, हातपंपांच्या पाणीपातळीत अद्यापपर्यंत वाढ झाली नसून ३ मध्यम व १३१ लघू अशा एकंदरित १३४ सिंचन प्रकल्पांपैकी शंभरावर प्रकल्प आजही कोरडेच आहेत.दरम्यान, जमिनीत किमान ९ ते १० इंचाची ओल आल्याशिवाय शेतकऱ्यांनी खरीपातील पिकांच्या पेरणीची घाई करू नये; अन्यथा पावसाचा खंड पडल्यास दुबार पेरणीची शक्यता उद्भवू शकते, असा इशारा कृषी विभागाने दिला होता; मात्र पावसाळ्यास आधीच उशिर झाल्याने आणि पावसाचा जोर वाढल्यास पेरणीची कामे शक्य होणार नसल्याने पहिल्या एक-दोन पावसातच सुमारे ५० टक्के शेतकºयांनी पेरण्या आटोपल्या आहेत. त्यास कृषी विभागाकडूनही दुजोरा मिळाला. दरम्यान, हा निर्णय बहुतांशी गावांमध्ये सद्यातरी योग्य ठरल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमRainपाऊसagricultureशेतीFarmerशेतकरी