जिल्हय़ातील ५0 वीज चोरांकडून पाच लाख रुपये दंड वसूल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:52 IST2017-09-15T01:52:36+5:302017-09-15T01:52:44+5:30
गत आठवड्यापासून महावितरणने वीज चोरट्यांविरुद्ध धडक कारवाईची मोहीम हाती घेतली असून, ७ सप्टेंबर रोजी वीज चोरी करताना आढळून आलेल्या ५0 ग्राहकांकडून ५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे; तर १४ सप्टेंबर रोजी आणखी ४0 वीज चोरांना पकडण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता पी.के.चव्हाण यांनी दिली.

जिल्हय़ातील ५0 वीज चोरांकडून पाच लाख रुपये दंड वसूल!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: गत आठवड्यापासून महावितरणने वीज चोरट्यांविरुद्ध धडक कारवाईची मोहीम हाती घेतली असून, ७ सप्टेंबर रोजी वीज चोरी करताना आढळून आलेल्या ५0 ग्राहकांकडून ५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे; तर १४ सप्टेंबर रोजी आणखी ४0 वीज चोरांना पकडण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता पी.के.चव्हाण यांनी दिली.
जिल्हय़ातील शहरांसह ग्रामीण भागातील विद्युत फिडरवरील वीज चोरीचे प्रमाण वाढले असून, त्याचा थेट परिणाम नियमित वीज देयक अदा करणार्या ग्राहकांवर होत आहे. याशिवाय महावितरणचेही महिन्याकाठी लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेऊन गत आठवड्यापासून महावितरणने विशेष पथक तयार करून शंकास्पद ग्राहकांचे मीटर तपासण्याची मोहीम हाती घेतली आहे. या माध्यमातून गत आठवड्यात जिल्हय़ातील ५0 ग्राहक वीज चोरी करताना आढळून आले. त्यांच्याकडून ५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच १४ सप्टेंबरला पुन्हा जिल्हय़ात कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यादरम्यान वाशिम तालुक्यात ९, मालेगाव १0, रिसोड ६, मंगरूळपीर ७ आणि कारंजा लाड तालुक्यातील ८ वीज चोरांना पकडण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी दिली.
-