मार्च एंडमुळे ५० टक्के उपस्थितीचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:40 IST2021-03-25T04:40:06+5:302021-03-25T04:40:06+5:30

राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट उसळली आहे. विविध प्रशासकीय कार्यालयात कार्यरत अधिकारी, कर्मचा-यांनाही कोरोना संसर्गाची लागण होत असल्याचे दिसत ...

50% attendance fuss due to March end | मार्च एंडमुळे ५० टक्के उपस्थितीचा फज्जा

मार्च एंडमुळे ५० टक्के उपस्थितीचा फज्जा

राज्यात कोरोना संसर्गाची दुसरी लाट उसळली आहे. विविध प्रशासकीय कार्यालयात कार्यरत अधिकारी, कर्मचा-यांनाही कोरोना संसर्गाची लागण होत असल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने प्रशासकीय, निमशासकीय कार्यालयांत ५० टक्के कर्मचाºयांना आळीपाळीने बोलावण्याचे आदेश जारी केले आहेत. तथापि, मार्च एडिंगची कामे वाढल्याने या आदेशाच पालन करणे प्रशासकीय कार्यालयांना अशक्य होत असल्याने बुधवारी विविध प्रशासकीय कार्यालयांत अधिकारी, कर्मचा-यांच्या उपस्थितीवरून दिसून आले. त्यात वाशिम येथील पंचायत समितीत कोरोना संसर्गाची पुरेपूर दक्षता खबरदारी बाळगून काम करण्यात येत असल्याचे दिसून आले.

--------

सा.बां. विभाग कार्यालय

वाशिम येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात काही कक्षांत आवश्यक कर्मचाºयांच्या उपस्थितीत काम करण्यात येत असल्याचे दिसून आले, तर एक दोन कक्षात मार्च एंडिंगच्या पार्श्वभूमीवर सर्व कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले. कार्यालयाच्या व्हरांड्यात मात्र गर्दीवर नियंत्रण ठेवण्यात आल्याचे चित्र दिसून आले.

==========

पंचायत समिती, वाशिम

वाशिम येथील पंचायत समिती कार्यालयात कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. कार्यालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारे बंद ठेवून, मागच्या भागातील लहान प्रवेशद्वारातून ग्रामस्थ, अधिकारी, कर्मचाºयांना येजा करण्याची सोय केली आहे. कार्यालयात बहुतांश कक्षात मोजकेच कर्मचारी दिसून आले.

---------------

तहसील कार्यालय, वाशिम

सद्यस्थितीत मार्च एंडिंगची कामे सुरू असल्याने ५० टक्के कर्मचारी उपस्थितीच्या आदेशाचे पालन करणे कठीण होत आहे. या ठिकाणी विविध कामांसाठी येणाºया नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. कार्यालयातील प्रत्येक कक्षात अधिकारी, कर्मचारी सायंकाळी उशिरापर्यंत काम करीत असून, काहींना, तर सुटीच्या दिवशीही काम करावे लागत असल्याचे माहितीवरून कळले आहे.

-----------

कोट: कामाच्या देयकांबाबत चौकशी करण्यासह विविध कामांच्या निविदा प्रक्रिया आणि इतर कामांची माहिती घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात वारंवार यावे लागते. सद्यस्थितीत कोरोना संसर्ग वाढत असल्याने आम्ही मास्क बांधूनच येथे वावरतो. अधिकारी, कर्मचा-यांकडूनही कोणताच त्रास होत नाही. तथापि, अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

-आनंद राऊत, नागरिक

----------------------

कोट: घरकुल योजनेच्या अनुदानाबाबत चौकशीसाठी पंचायत समितीत कार्यालयात यावे लागते. सद्यस्थितीत मार्च एंडिंगची कामे सुरू असताना गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यालयाच्या मागील प्रवेशद्वारातून आम्हाला प्रवेश देण्यात आला. कर्मचाºयांची संख्या कमी असल्याने आमचे शंका निरसनही व्यवस्थीतपणे होऊ शकले नाही.

-दिलिप कांबळे, ग्रामस्थ

------------------

कोट: तहसील कार्यालयात निराधार योजनेच्या अर्जांची माहिती घेण्यासाठी आलो होतो. या ठिकाणी मार्च एंडिगंची कामे सुरू असून, विविध कामासाठी आलेले अनेक लोक उभे असल्याचे दिसले. काही वेळ प्रतीक्षा केली, परंतू नागरिकांची संख्या फारशी कमी झाली नाही. कोरोना संसर्गाची भिती असल्याने अधिकाºयांची भेट न घेताच गावी परत जावे लागत आहे.

- प्रल्हाद भालेराव, ग्रामस्थ

Web Title: 50% attendance fuss due to March end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.