शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: नाशिक, दिंडोरीत ९ वाजेपर्यंत ६ टक्के मतदान
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live ठाण्यात बोगस मतदानासाठी दीड हजार लोक आणून ठेवलेत; राजन विचारेंचा गंभीर आरोप
3
गुजरातच्या GST अधिकाऱ्याने साताऱ्यात विकत घेतले संपूर्ण गाव; एकाही अधिकाऱ्याने केला नाही तपास
4
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
5
मेले ते गेले... तुमचे नातेवाईक नव्हतेच ते!
6
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
7
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
8
सहा ठिकाणी शिंदेसेना VS उद्धवसेना; लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील १३ मतदारसंघांमध्ये आज मतदान
9
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
10
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
11
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
12
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
13
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
14
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
15
चॉकलेटच्या वडीचा आकार आता लहान होणार, कारण...
16
‘MPSC’ची ढकलगाडी; ...तर एमपीएससीच्या सक्षमीकरणाशिवाय पर्याय नाही
17
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
18
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
19
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
20
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी

५ शेतमाल चोरट्यांना अटक; ८.९० लाखांचा मुद्देमाल जप्त

By संतोष वानखडे | Published: May 08, 2024 7:57 PM

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आल्याची माहिती ८ मे रोजी पोलिस प्रशासनाने दिली. 

वाशिम: मारसूळ (ता.मालेगाव) येथील गोडावूनमधून ६ क्विंटल सोयाबीन लंपास करणाऱ्या पाच चोरट्यांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आल्याची माहिती ८ मे रोजी पोलिस प्रशासनाने दिली. मारसूळ येथील शेतकरी अरुणराव शंकरराव घुगे (५२) यांच्या फिर्यादीनुसार, २७ एप्रिलच्या रात्रीदरम्यान अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीच्या गोडावूनमधून ६ क्विंटल सोयाबीन लंपास केली होती. यप्रकरणी मालेगाव पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्यांविरूद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पाच आरोपींबाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनिय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे शुभम मधुकर खंडारे (वय २६), आकाश वसंत खंडारे (वय २७),  सोनू प्रभू लठाड (वय २७), श्याम शिलपत पवार (वय २४) सर्व रा.चिखली, ता.मंगरूळपीर व स्वप्नील देवानंद जाधव (वय २०) रा.रामराववाडी, मंगरूळपीर यांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यातील आरोपींकडे अधिक तपास केला असता त्यांच्याकडून १ लाख १८ हजार ८०० रुपये किंमतीचे एकूण २७ क्विंटल सोयाबीन,  ७३ हजार ६०० रुपये किंमतीचा १६ क्विंटल हरभरा, १ लाख ९८ हजार रुपये किंमतीची १८ क्विंटल तूर व गुन्ह्यात वापरलेले एमएच ३० बीडी ५०५४ क्रमांकाचे टाटा एस. वाहन असा एकूण ८.९० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक रमाकांत खंदारे व योगेश धोत्रे, पोलीस अंमलदार प्रशांत राजगुरू, राजेश राठोड, आशिष बिडवे, ज्ञानदेव मात्रे, दिपक घुगे, विठ्ठल महाले व संदिप डाखोरे यांनी पार पाडली.

इतर हद्दीतील १० गुन्हेही उघड

उपरोक्त आरोपितांकडून पो.स्टे.मालेगाव येथे दाखल व हद्दीतील ३ शेतमाल चोरीचे गुन्हे, पो.स्टे. शिरपूर येथे दाखल व हद्दीतील २ शेतमाल चोरीचे गुन्हे, पो.स्टे. रिसोड येथे दाखल व हद्दीतील २ शेतमाल चोरीचे गुन्हे व पो.स्टे.मंगरूळपीर येथे दाखल व हद्दीतील ३ शेतमाल चोरीचे गुन्हे असे एकूण १० विविध कलमान्वये दाखल शेतमाल चोरीचे गुन्हे उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश प्राप्त झाले . या गुन्ह्यांतील ५ आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कायदेशीर कारवाईसाठी पो.स्टे.मालेगाव यांच्या ताब्यात देण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमFarmerशेतकरी