८४ ग्रामपंचायतींसाठी ४.८५ कोटींचा निधी
By Admin | Updated: January 15, 2016 02:12 IST2016-01-15T02:12:23+5:302016-01-15T02:12:23+5:30
ग्रामपंचायतींचे बळकटीकरण आणि गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी निधीचे वितरण.

८४ ग्रामपंचायतींसाठी ४.८५ कोटींचा निधी
वाशिम: ग्रामपंचायतींचे बळकटीकरण आणि गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी १४ व्या वित्त आयोगातून वाशिम तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींच्या बँक खात्यात ४ कोटी ८५ लाख ६७ हजार ५७२ रुपयांचा निधी जमा करण्यात येत आहे. अडोळी ९.७१ लाख, अडगाव खु. ३.६ लाख, अंजनखेडा १ लाख ७६ हजार, असोला ज. ३ लाख ४ हजार, अनसिंग २९ लाख ९६ हजार, ब्रह्म ५ लाख ८६ हजार, ब्राह्मणवाडा ४ लाख, बाभुळगाव ५ लाख ४१ हजार, हिसे बोराला ७ लाख ७ हजार, बोरी २ लाख ८६ हजार, भोयता २ लाख २२ हजार, चिखली बु. ८ लाख ५६ हजार, चिखली खु. ४ लाख ४६ हजार, ढील्ली ५ लाख १ हजार, देवढाणा बु. ३ लाख २ हजार, धुमका ५ लाख ६९ हजार, धानोरा बु. ५ लाख ५ हजार, धानोरा खु. ३ लाख २२ हजार, एकांबा ३ लाख ४१ हजार, इलखी ३ लाख २४ हजार, फाळेगाव थेट ४ लाख ५८ हजार, गणेशपूर ३ लाख २0 हजार, गोंडेगाव ३ लाख ५२ हजार, हिवरा रोहिला ५ लाख ५0 हजार, जयपूर ५ लाख ५१ हजार, जवळा २ लाख ३६ हजार, जुमडा ४ लाख ६२ हजार, जांभरूण महाली ६ लाख ७ हजार, जांभरुण नावजी ४ लाख ६७ हजार, जांभरुण परांडे ३ लाख ४९ हजार, किनखेडा ३ लाख १२ हजार, कोंडाळा महाली ५ लाख १४ हजार, कोंडाळा झामरे ६ लाख ६३ हजार, कोकलगाव ४ लाख २४ हजार, कळंबा महाली ९ लाख ३७ हजार, काटा ११ लाख १३ हजार याप्रमाणे एकूण ८४ ग्रामपंचायतींच्या बँक खात्यात थेट निधी जमा करणे सुरू आहे.