मालेगाव तालुक्यात ४८० घरकूले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:27 IST2021-02-05T09:27:32+5:302021-02-05T09:27:32+5:30

.................. कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती रखडली ! रिसोड : जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाला शासनाकडून चालू आर्थिक वर्षात निधी मिळाला नाही. ...

480 households in Malegaon taluka | मालेगाव तालुक्यात ४८० घरकूले

मालेगाव तालुक्यात ४८० घरकूले

..................

कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती रखडली !

रिसोड : जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाला शासनाकडून चालू आर्थिक वर्षात निधी मिळाला नाही. परिणामी रिसोड तालुक्यातील लघुप्रकल्प, कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या दुरुस्तीची कामे रखडली आहेत. निधी केव्हा मिळणार याकडे लक्ष लागून आहे.

.....................

महामंडळाच्या योजनेचा लाभ घ्या

अनसिंग : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत इतर मागास प्रवर्गातील लाभार्थींसाठी ४ कर्ज योजना राबविल्या जात आहेत. जिल्ह्यातील इच्छुक व पात्र लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले.

...................

वीजपुरवठा खंडित करणाऱ्याचा शोध

शेलूबाजार : कंझरा फीडरच्या वाहिनीवर तार टाकून वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रकार अज्ञात व्यक्तीकडून होत आहे. यासंदर्भात महावितरणचे कनिष्ठ अभियंता अतुल गोडबोले यांनी तक्रार दिल्यानंतर वीजपुरवठा खंडित करणाऱ्याचा शोध घेतला जात आहे.

.......................

बसफेरीसाठी ग्रामस्थ आक्रमक

ताेंडगाव : गेल्या दीड वर्षापासून मंगरूळपीर आगाराकडून धानोरा-चेहेलमार्गे कोठारी-कवठळ ही बसफेरी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो प्रवाशांना अडचणी येत असून, ही बसफेरी सुरू करण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत

.....................

रोजगार सेवकांचे मानधन प्रलंबित

केनवड : गेल्या तीन महिन्यांपासून मानधन प्रलंबित असल्याने केनवडसह रिसोड तालुक्यातील रोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रलंबित मानधन तातडीने अदा करण्याची मागणी रोजगार सेवक संघटनेने केली आहे.

..................

तूर उत्पादनात घट; शेतकरी चिंतित

शिरपूर : शिरपूर परिसरात तुरीची सोंगणी व काढणी सुरू असून, एकरी उत्पादनात घट येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. विविध किडींमुळे आणि मर रोगामुळे तूर पीक धोक्यात सापडले होते. अनेक शेतकऱ्यांना एकरी एक ते दोन क्विंटलचे उत्पादन होत असल्याने लागवड खर्चही वसूल होणार नसल्याची शक्यता शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे.

Web Title: 480 households in Malegaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.