४८ टक्के नागरिक ‘हिंदी दिन’पासून अनभिज्ञ
By Admin | Updated: September 13, 2014 23:05 IST2014-09-13T23:05:32+5:302014-09-13T23:05:32+5:30
लोकमतचे सर्वेक्षन; हिंदी दिवस दुर्लक्षीत, प्रचार व प्रसाराची गरज

४८ टक्के नागरिक ‘हिंदी दिन’पासून अनभिज्ञ
वाशिम : राष्ट्रभाषा हिंदी असतांना बर्याच जणांना भाषेबाबत काही महत्वाच्या गोष्टींची माहिती नसल्याचे लोकमतने केलेल्या सर्व्हेक्षणातून पुढे आले आहे. विशेष म्हणजे १४ सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस आहे याची ही कल्पना अध्र्याअधिक युवकांना नसल्याचे सर्व्हेक्षणात आढळून आले. हिंदी सर्वांना समजते व बोलायलाही आवडते पण त्याबाबतची माहिती, भाषेची लिपी, भाषेतील वर्ण, हिंदी दिवस कधीपासून सुरू करण्यात आला याबाबतची माहिती अनेक युवकांना माहित नाही. राष्ट्रभाषा वाचविण्याकरीता तीचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे झाले आहे यावरून स्पष्ट होते.
लोकमतने केलेल्या सर्व्हेक्षणामध्ये हिंदी दिवस कोण्यादिवशी साजरा केल्या जातो याबाबत ४८ विद्यार्थ्यांसह नागरिकांनी १४ सप्टेंबर तर ५२ टक्के नागरिकांनी वेगवेगळया तारखा सांगितल्यात. हिंदी भाषा कोणत्या लिपीमध्ये आहे याचे उत्तर मात्र ७८ टक्के नागरिकांनी बरोबर दिले. हिंदी भाषेत एकूण किती वर्ण आहेत याबाबत केवळ १२ टक्केच निागरिक सांगू शकलेत. हिंदी भाषेचा वापर दैनदिन व्यवहारामध्ये लिखानासाठी ३२ टक्के नागरिक करतात तर ५४ टक्के नागरिक कधी कधी वापर करतात मात्र १४ टक्के नागरिक याचा वापर करीत नाहीत. हिंदी भाषेची वैशिष्टे असलेले मुक्तेवाले वर्ण कीती हे केवळ २२ टक्केच नागरिक सांगू शकलेत.
७८ टक्के नागरिकांना याची माहीती नाही. हिंदी भाषेत पूर्णविराम कसा लिहिला जातो याबाबत मात्र ७२ टक्के नागरिकांना माहिती दिसून आली. ऋ, लृ व ज्ञ यापैकी कोणते वर्ण हिंदीमध्ये वापरल्या जात नाही यासंदर्भात ५९ टक्के निागरिकांनी अनभिज्ञ दिसून आलेत. ह्यकाला अक्षर म्हैस बराबरह्ण ही म्हण पूर्ण करण्यात मात्र ९५ टक्के नागरीक पास झालेत. हिंदी भाषेतील प्रसिध्द साहित्यीक कोण याचे मुन्शी प्रेमचंद बरोबर ७८ टक्के नागरिकांनी सांगितले. हिंदी दिवस कोणत्या वर्षापासून साजरा करण्यास सुरूवात झाली याची माहिती मात्र केवळ ७ टक्के नागरिकांनाच दिसून आली यावरून या भाषेचा प्रचार व प्रसार आवश्यक आहे