४६ हरकती खारीज
By Admin | Updated: February 18, 2015 02:00 IST2015-02-18T02:00:28+5:302015-02-18T02:00:28+5:30
वाशिम जिल्हय़ातील १६५ ग्रामपंचायतींची निवडणूक.

४६ हरकती खारीज
अमोल कल्याणकर / मालेगाव (जि. वाशिम): वाशिम जिल्हय़ात मुदत संपलेल्या १६५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान होणार आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार प्रभाग रचना, आरक्षण यांच्यासह काही हरकती असल्यास त्या सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार जिल्हय़ातील ग्रामपंचायतच्यावतीने ७४ हरकती दाखल करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ४६ हरकती खारीज करण्यात आल्या असून, २८ हरकती मान्य करण्यात आल्या असून, त्यात सुचवलेले बदल होणार आहेत. मालेगाव तालुक्यात मुदत झालेल्या ३१ ग्रामपंचायतच्या निवडणुका होणार आहेत. त्यामधील ९ ग्रामपंचायतींमधील १४ हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी ३ ग्रामपंचायतींमधील ६ हरकती अमान्य केल्या असून, ६ ग्रामपंचायतींमधील ८ हरकती मान्य केल्या आहेत. रिसोड तालुक्यात ३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहे. रिसोड तालुक्यात ९ ग्रामपंचायतीतील ११ हरकती आल्या होत्या. त्यामध्ये २ ग्रामपंचायतीतील २ हरकती खारीज, तर ७ ग्रामपंचायतीतील ९ हरकती मान्य करण्यात आल्या आहेत. वाशिम तालुक्यात २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असून, ८ ग्रामपंचायतींमध्ये २७ हरकती घेण्यात आल्या होत्या, त्यापैकी ७ ग्रामपंचायतींच्या २६ हरकती रद्द केल्या आहेत, तर केवळ एक ग्रामपंचायतमधील हरकत मान्य केली आहे. मंगरुळपीर तालुक्यात २५ ग्रा.पं.च्या निवडणुका होणार असून, ८ ग्रा.पं.मध्ये ११ हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यापैकी ५ ग्रा.पं.मधील ६ हरकती रद्द केल्यात, तर २ ग्रापंमधील ५ हरकती मान्य केल्या आहेत. कारंजा तालुक्यात २८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असून, त्यामध्ये २ ग्रामपंचायतींमधील २ हरकती होत्या. त्या दोन्ही हरकती मान्य करण्यात आल्यात. मानोरा तालुक्यात २३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहे. ५ ग्रामपंचायतींमधील ९ हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यात ४ ग्रामपंचायतींमधील ६ हरकती रद्द केल्यानंतर २ ग्रा.पं.मधील ३ हकरती मान्य केल्या आहेत. संपूर्ण जिल्हय़ात १६५ ग्रामपंचायतीमध्ये ४१ ग्रामपंचायतीमधून ७४ हरकती घेण्यात आल्या होत्या. यामध्ये २१ ग्रामपंचायतीमधून ४६ हरकती रद्द केल्या व २0 ग्रामपंचायतीमधून २८ हरकती मान्य केल्या आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीला बराच अवधी असला तरी गावांमध्ये आतापासूनच फिल्डिंग लावणे सुरू दिसून येत आहे.