रिसोड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना मिळणार ४१ शिक्षक!
By Admin | Updated: July 16, 2017 02:10 IST2017-07-16T02:10:56+5:302017-07-16T02:10:56+5:30
गटशिक्षणाधिकार्यांची माहिती : १७ जुलैला पदस्थापना.

रिसोड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांना मिळणार ४१ शिक्षक!
लोकमत न्यूज नेटवर्क
रिसोड : संचमान्यतेनुसार तालुक्यातील शिक्षकांची पदे रिक्त असणार्या जिल्हा परिषद शाळांना ४१ शिक्षक मिळणार असून, १७ जुलैला संबंधित शिक्षकांना पदस्थापना दिली जाणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी पंजाबराव खराटे यांनी शनिवारी दिली.
तालुक्यातील १0८ जिल्हा परिषद शाळांना एकूण ३८२ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र, त्यापैकी सध्या ३४१ शिक्षक कार्यरत असून, ४१ शिक्षकांची कमतरता भासत होती. यामुळे विद्यार्थ्यांंनाही शैक्षणिक नुकसानाला सामोरे जावे लागत असे. यादरम्यान, १0 जुलै रोजी ह्यऑनलाइनह्ण पद्धतीने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात आली. या माध्यमातून बदली झालेल्या सर्व शिक्षकांना १७ जुलै रोजी पदस्थापना देण्यात येणार आहे.
यामध्ये रिसोड तालुक्याला ४१ शिक्षक मिळणार आहेत. त्यांना ज्या गावातील शिक्षकांचे पद रिक्त आहे, त्या जागेवर पदस्थापना मिळणार आहे. त्यामुळे आता शाळेवर शिक्षक नसल्याची तक्रार कुणालाही करावी लागणार नाही, असे गटशिक्षणाधिकारी खराटे यांनी सांगितले.