संकटकाळात ४० रक्तदात्यांनी केले स्वयंस्फूर्त रक्तदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:41 IST2021-05-10T04:41:13+5:302021-05-10T04:41:13+5:30
कारंजा येथील कामाक्षा देवी मंदिर सभागृहात ९ मे रोजी सकाळी ९ ते २ या वेळेत स्थानिक परिवर्तन बहुद्देशीय संस्था ...

संकटकाळात ४० रक्तदात्यांनी केले स्वयंस्फूर्त रक्तदान
कारंजा येथील कामाक्षा देवी मंदिर सभागृहात ९ मे रोजी सकाळी ९ ते २ या वेळेत स्थानिक परिवर्तन बहुद्देशीय संस्था आणि श्री छत्रपती प्रतिष्ठान, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने महाराणा प्रताप यांच्या ४८१ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना महामारीच्या संकटकाळात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होण्यासोबतच रक्तपेढ्यांमधील रक्ताचा साठाही संपत चालला आहे. कोरोना लसीकरणानंतर किमान १४ ते २८ दिवस रक्तदान करता येत नाही. तसेच २८ दिवसांनी लसीचा दुसरा डोस घ्यावा लागतो. त्यानंतरही रक्तदान करता येत नसल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे. दरम्यान, आपल्या प्रियजनांना रक्ताचा तुटवडा भासू नये हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून कारंजा येथील कामाक्षा देवी मंदिर सभागृहात ९ मे रोजी सकाळी ९ ते २ या वेळेत स्थानिक परिवर्तन बहुद्देशीय संस्था आणि श्री छत्रपती प्रतिष्ठान, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने महाराणा प्रताप यांच्या ४८१ व्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सहभागी प्रत्येक रक्तदात्यास अंकुर सिड्स, नागपूरतर्फे कॉलेज बॅग प्रोत्साहनपर भेट म्हणून देण्यात आली. या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिवर्तन बहुद्देशीय संस्था, श्री छत्रपती प्रतिष्ठान, अंकुर सिड्स तसेच अन्य युवकांनी परिश्रम घेतले.