महिला बचत गटांना ३८ लाखांचे कर्ज वाटप
By Admin | Updated: September 10, 2014 00:17 IST2014-09-10T00:17:32+5:302014-09-10T00:17:32+5:30
वाशिम जिल्हय़ातील १६ महिला बचत गटांना एकूण ३८ लाख २0 हजार रुपयांचे कर्ज वाटप.

महिला बचत गटांना ३८ लाखांचे कर्ज वाटप
वाशिम : महिलांचे जीवनमान उंचावण्याच्या उदात्त हेतूने नाबार्ड फायनान्स व स्वयंशासन बहुद्देशीय महिला महिला विकास संस्था वाशिमच्या वतीने जिल्हय़ातील १६ महिला बचत गटांना एकूण ३८ लाख २0 हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले.
यामध्ये वाशिम तालुक्यातील ७ महिला बचत गटांना एकूण १६ लाख १0 हजारांचे, मालेगाव तालुक्यातील सहा बचत गटांना एकूण १५ लाख १0 हजारांचे, तर मानोरा तालुक्यातील ३ बचत गटांना एकूण ७ लाखांचे कर्ज वाटप करण्यात आले. यावेळी स्वयंशासन बहुद्देशीय महिला विकास संस्थेचे संचालक माधवराव इंगोले, नाबार्ड फायनान्सचे जिल्हा व्यवस्थापक उदय नानकर, तसेच संस्थेच्या अध्यक्षा कमल माधव इंगोले यांच्या उपस्थित होत्या.