जिल्ह्यात २०२० मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांवर ३८ हल्ले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:31 IST2021-01-10T04:31:31+5:302021-01-10T04:31:31+5:30
...................... बॉक्स : १५० जणांवर कारवाई जिल्ह्यात २०२० मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्याच्या एकूण ३८ घटना घडल्या. आरोग्य, पोलीस ...

जिल्ह्यात २०२० मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांवर ३८ हल्ले
......................
बॉक्स :
१५० जणांवर कारवाई
जिल्ह्यात २०२० मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ले झाल्याच्या एकूण ३८ घटना घडल्या. आरोग्य, पोलीस आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्यांच्या यात सर्वाधिक समावेश आहे. दरम्यान, घटनेची तक्रार त्या-त्या पोलीस ठाण्यांमध्ये झाल्यानंतर पोलिसांनी ३८ घटनांमध्ये सुमारे १५० आरोपींवर कारवाई केलेली आहे. त्यातील काही आरोपींना अटकदेखील करण्यात आली आहे.
........................
२०२० मध्ये पोलीस कर्मचाऱ्यांवर
हल्ल्याच्या १२ घटना घडल्या.
.......................
बॉक्स :
पोलीस कर्मचाऱ्यांना केले टार्गेट
वाशिममध्ये १४ जुलै रोजी अवैध कत्तलखान्यावर कारवाई करताना तेथील काही लोकांनी पोलिसांवर अचानक दगडफेक केली. त्या घटनेत १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यासह ९ जणांना अटक करण्यात आली होती. २०२० मध्ये महसूल विभागातील कर्मचाऱ्यांवरही हल्ले झाल्याची नोंद पोलिसांत झालेली आहे.
........................
जून, जुलैमध्ये हल्ल्याच्या सर्वाधिक घटना
पोलीस विभाग - १२
आरोग्य विभाग - ७
महसूल विभाग - ५