सापडलेली ३.७५ लाखांची रक्कम केली परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:40 IST2021-02-13T04:40:10+5:302021-02-13T04:40:10+5:30

प्राप्त माहितीनुसार, कामरगाव येथील शेतकरी उज्वल भास्कर देशमुख हे सोयाबीन विकून मिळालेली ३ लाख ७५ हजार रूपयांची रक्कम असलेली ...

3.75 lakhs found and returned | सापडलेली ३.७५ लाखांची रक्कम केली परत

सापडलेली ३.७५ लाखांची रक्कम केली परत

प्राप्त माहितीनुसार, कामरगाव येथील शेतकरी उज्वल भास्कर देशमुख हे सोयाबीन विकून मिळालेली ३ लाख ७५ हजार रूपयांची रक्कम असलेली पिशवी दुचाकीवर समोर ठेऊन भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत खात्यात जमा करण्याकरीता जात होते. सदर पिशवी नकळत दुचाकीवरून खाली पडली. एवढ्यात त्याच मार्गाने मागून येणारे शेख मुराद शेख उस्मान यांना ती पैशाने भरलेली थैली सापडली. देशमुख स्टेट बँकेत जाताच पिशवी वाहनास नसल्याचे लक्षात आल्याने ते त्याचमार्गे लगेच माघारी फिरले. तेव्हा शेख मुराद शेख उस्मान हे हातात पिशवी घेऊन रस्त्यातच उभे होते. ओळख पटल्यानंतर त्यांनी लगेच ती पिशवी देशमुख यांना परत करून आपल्यातील प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. त्यांच्या या प्रामाणिकपणासाठी ग्रामस्थातून त्यांचे कौतुक होत आहे.

Web Title: 3.75 lakhs found and returned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.