वाशिम जिल्हयात ३७४ नवदुर्गा
By Admin | Updated: September 25, 2014 01:22 IST2014-09-25T01:22:57+5:302014-09-25T01:22:57+5:30
ग्रामीण २५८ तर : शहरीभागात ११६ नवदुर्गेचा सहभाग.

वाशिम जिल्हयात ३७४ नवदुर्गा
वाशिम : मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतीक असणारा दुर्गोत्सव २५ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या उत्सवात जिल्हयात ३७४ नवदुर्गांची स्थापना होणार आहे. यामध्ये शहरी भागात ११६ तर ग्रामीण भागात २५८ नवदुर्गेचा सहभाग आहे.
जिल्हयात दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी नवदुर्गा उत्सव उत्साहात व शांततेत साजरा होण्याच्या दृष्टीकोनातून नवदुर्गा उत्सव मंडळ व पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हयात स्थापन करण्यात येत असलेल्या नवदुर्गामध्ये कारंजा तालुक्यात ७७, मंगरूळपीर तालुक्यात ५0, मानोरा तालुक्यात ५२, मालेगाव तालुक्यात ८९, वाशिम तालुक्यात ६७ तर रिसोड तालुक्यात ४८ नवदुर्गांचा समावेश आहे. तसेच काही ठिकाणी शारदा देवींची सुध्दा स्थापना करण्यात येत असून नोंदणी केलेल्यामध्ये कारंजात ५, मंगरूळपीर येथे २ तर वाशिम येथे २ ठिकाणी शारदा देवीची स्थापना करण्यात येत आहे. नवदुर्गा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन दक्ष दिसून येत आहे.