३७ जणांची कोरोनावर मात; १४ पॉझिटिव्ह !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:27 IST2021-07-02T04:27:58+5:302021-07-02T04:27:58+5:30

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले ...

37 defeated Corona; 14 Positive! | ३७ जणांची कोरोनावर मात; १४ पॉझिटिव्ह !

३७ जणांची कोरोनावर मात; १४ पॉझिटिव्ह !

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने जिल्हावासीयांना दिलासा मिळत आहे. नव्याने कोरोना रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण अतिशय घटले असून, कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्यादेखील वाढत असल्याचे चित्र आहे. गुरुवारी नव्याने १४ रुग्ण आढळून आले तर ३७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. वाशिम तालुक्यात एकही रुग्ण आढळून आला नाही. मालेगाव शहरात एक तर ग्रामीण भागात दोन, रिसोड तालुक्यात एक, मंगरूळपीर शहरात दोन तर ग्रामीण भागात चार, कारंजा तालुक्यात एक, मानोरा तालुक्यात एक रुग्ण आढळून आला. आतापर्यंत ४१४२८ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४०६४४ रुग्णांनी कोरोनावर मात केली तर ५१९ जणांचा मृत्यू झाला.

००००

१६४ सक्रिय रुग्ण

गुरुवारच्या अहवालानुसार नव्याने १७ रुग्ण आढळून आले तर ३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या सरकारी कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, खासगी कोविड हॉस्पिटल, गृहविलगीकरणात असे एकूण १६४ रुग्ण सक्रिय आहेत.

Web Title: 37 defeated Corona; 14 Positive!