शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभागात तब्बल ३६ पदे रिक्त!

By admin | Updated: September 19, 2014 23:49 IST

रिसोड तालुक्यातील प्रकार : रिक्त पदांचा कामकाजावर परिणाम.

विवेकानंद ठाकरे / रिसोडदरवर्षी कोट्यवधी रुपयांचा महसूल वसूल करण्याची महत्वपुर्ण जबाबदारी असलेल्या रिसोड येथील महसूल विभागात रिक्त पदांचा आलेख उंचावला आहे. सध्यस्थितीला तलाठी पदे आठ रिक्त असून कोतवालांचेही २0 पदे रिक्त आहेत.तालुक्यामध्ये उजाड गावांसह एकूण गावांचा आकडा १00 च्या घरात आहे. गावाचा महसूल विभागाचा प्रमुख म्हणून तलाठी व तलाठय़ाला सहकारी म्हणून कोतवाल हे महत्वाचे पदे आहे. गावातील शेतीचा आढावा घेण्यासाठी तलाठी व कोतवालावर महत्वपुर्ण जबाबदारी असते. गारपीट, अतवृष्टी, सर्व्हे, निवडणुक, शेतसारा, आम आदमी निराधार योजनेचा अहवाल यासह विविध महत्वपुर्ण बाबी तलाठी यांच्याकडे देण्यात आल्या आहेत. त्यामुळे तलाठयांकडे कामाचा बोजा वाढत आहे. तर दुसरीकडे कर्मचार्‍यांची रिक्त पदे असल्याने कामाचा ताणही वाढत आहे. तालुक्यामध्ये १00 गावाकरिता ८ मंडळ अधिकारी व ४२ तलाठी व ३0 कोतवाल कार्यरत आहे. तहसिल कार्यालयातही रिक्त पदांचा प्रश्न आहे. यामध्ये कार्यालयाअंतर्गत कनिष्ठ लिपीकांचे ६ पदे रिक्त असून १0 पदे कार्यरत आहे व शिपाई यांचे २ पदे रिक्तच आहे. एकूण महसूल विभागात तब्बल ३६ पदे रिक्त आहे. रिक्त पदामुळे प्रशासकीय कामावर विपरीत परिणाम होत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देणे अपेक्षीत आहे.रिसोडचे तहसीलदार अमोल कुं भार यांनी रिक्त पदांमुळे इतर कर्मचार्‍यांवर कामाचा अतिरिक्त भार पडत असून त्यामुळे कामाची गती काही प्रमाणात कमी होत असल्याचे सांगीतले.