गोवंशाच्या रक्षणासाठी ३६ लाखांचे अनुदान वाटप

By Admin | Updated: May 11, 2015 01:58 IST2015-05-11T01:58:38+5:302015-05-11T01:58:38+5:30

समस्त महाजन व अंतरिक्ष पार्श्‍वनाथ संस्थानचा स्तुत्य उपक्रम.

36 lakhs subsidy for cattle protection | गोवंशाच्या रक्षणासाठी ३६ लाखांचे अनुदान वाटप

गोवंशाच्या रक्षणासाठी ३६ लाखांचे अनुदान वाटप

वाशिम : गोवंशाचे संगोपन, संवर्धन व रक्षणासाठी समस्त महाजन परिवार मुंबई यांच्या वतीने पश्‍चिम विदर्भातील जवळपास वीस गोशाळांना सुमारे ३६ लाख रुपयांचे अनुदानाचे धनादेश १0 मे रोजी वाटप करण्यात आले. अंतरिक्ष पार्श्‍वनाथ महाराज संस्थान व समस्त महाजन मुंबई व आदर्श गोरक्षण संस्था अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिरपूर जैन येथे श्‍वेतांबर जैन समाजाच्यावतीने पारस बागेत आयोजित या शिबिरात अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, लातूर, हिंगोली, परभणी, जालना आदी जिल्हय़ातील गोशाळा व गोरक्षण संस्थेचे संस्थाचालक व पदाधिकारी शेकडोंच्या संख्येत सहभागी झाले होते. पंन्यासप्रवर दिवंगत गुरुदेव चंद्रशेखर विजयजी महाराज यांचे परम शिष्य श्री विमलहंस विजयजी महाराज, श्री परमहंस विजयजी महाराज व श्री श्रमणहंस विजयजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या शिबिरात समस्त महाजन परिवाराचे मुंबईचे मॅनेजिंग ट्रस्टी गिरीषभाई शाह, पदाधिकारी उत्तमभाई शाह, अंतरिक्ष पार्श्‍वनाथ संस्थानचे मॅनेजिंग ट्रस्टी दिलीपभाई शाह, नरेंद्रभाई शाह, डॉ. संतोष संचेती, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष अँड. मोतीसिंग मोहता, आदर्श गोरक्षण अकोलाचे अध्यक्ष रतनलाल खंडेलवाल, सुभाषचंद्र जैन आलेगाव, श्यामसुंदर मुंदडा मालेगाव, शंकरलाल बियाणी अकोला, दायमा महाराज पारस, प्रा. सुभाषचंद्र गादीया अकोला आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: 36 lakhs subsidy for cattle protection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.