जिल्ह्यात ३,५४० शिक्षकांची हाेणार काेराेना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:35 AM2021-01-17T04:35:08+5:302021-01-17T04:35:08+5:30

कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. गत तीन महिन्यांपासून कोरोनाचा ...

3,540 teachers will be tested in the district | जिल्ह्यात ३,५४० शिक्षकांची हाेणार काेराेना चाचणी

जिल्ह्यात ३,५४० शिक्षकांची हाेणार काेराेना चाचणी

Next

कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाचा फटका सर्वच क्षेत्राला बसला आहे. यामधून शिक्षण क्षेत्रही सुटू शकले नाही. गत तीन महिन्यांपासून कोरोनाचा आलेख खाली येत आहे. २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू झालेले आहेत. आता कोरोनाचा आलेख आणखी खाली येत असल्याचे पाहून २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पाचवी ते आठवीच्या शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात आहे. जिल्ह्यात जवळपास ३,५४० शिक्षक असून, आतापर्यंत १,५४० शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली.

००००

जिल्ह्यातील शाळा ८३४

जिल्ह्यातील शिक्षक ३,५४०

कोरोना चाचणी १,५४०

अहवाल पाॅझिटिव्ह ००

००००

१,५४० चाचण्या पूर्ण

राज्य शासनाचे आदेश प्राप्त होण्यापूर्वीच वाशिम जिल्ह्यात इयत्ता पाचवी ते आठवीच्या शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात आहे. आतापर्यंत १,५४० शिक्षकांची कोरोना चाचणी केली असून, यापैकी एकाही जणाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला नाही.

०००००

चाचण्या कोठे, किती?

तालुकानिहाय शिक्षकांच्या कोरोना चाचणीची सोय कोविड केअर सेंटरमध्ये उपलब्ध केली आहे.

दैनंदिन सरासरी ४० ते ५० शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

शक्य तेवढ्या लवकर चाचणी करण्याच्या सूचना शिक्षकांना देण्यात आल्या आहेत.

००००

इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होणार असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून शिक्षकांची कोरोना चाचणी केली जात आहे. अशा सूचनाही गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत. सरकारी कोविड केअर सेंटर येथे कोरोना चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. शाळा सुरू करण्याबाबत आढावा घेतला जात आहे.

- अंबादास मानकर,

शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम

Web Title: 3,540 teachers will be tested in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.