पवारवाडी येथे ३३ हजाराची चोरी
By Admin | Updated: November 23, 2014 00:23 IST2014-11-23T00:23:04+5:302014-11-23T00:23:04+5:30
रिसोड तालुक्यातील घरफोडी.
_ns.jpg)
पवारवाडी येथे ३३ हजाराची चोरी
रिसोड (वाशिम): तीन अज्ञात चोरटयानी घरात घुसुन क पाटामधील सोन्याच्या दागीनासह नगदी १0 हजार असा एकूण ३३ हजार रुपयाचा माल लंपास केल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी उत्तर रात्री पवारवाडी येथे घडली आहे. पोलिस सुत्राकडून प्राप्त माहितीनुसार फिर्यादी मारोती दंवड वय ६0 वर्षे यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने राहत्या घरामध्ये तीन अज्ञात चोरटयांनी साखळी तोडून प्रवेश करुन कपाटामधील १ तोळयाच्या सोन्याचा सेवनपीस, नगदी १0 हजार व मोबाईल असा एकूण ३३ हजाराचा माल लंपास केला आहे. या प्रकरणी चोरटया विरुद्ध कलम ४५२, ३९४, ३२३, ५0६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.