त्रुटीमुळे ३१५३ शेतकरी पीएम किसानच्या लाभापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:26 IST2021-02-05T09:26:32+5:302021-02-05T09:26:32+5:30
केंद्र शासनाने २०१८ पासून शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. वाशिम जिल्ह्यात या योजनेचे १ लाख ...

त्रुटीमुळे ३१५३ शेतकरी पीएम किसानच्या लाभापासून वंचित
केंद्र शासनाने २०१८ पासून शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. वाशिम जिल्ह्यात या योजनेचे १ लाख ९८ हजार ७४३ शेतकरी आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांकडून त्यांचे खातेक्रमांक, आधार क्रमांक, आधारकार्डवरील नाव, बँक आयएफएससी कोड अचून भरून प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनानुसार शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केले आणि प्रस्तावानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानची रक्कमही जमा करण्यास सुरुवात झाली. परंतु, जिल्ह्यातील ३१५३ शेतकऱ्यांच्या प्रस्तावात त्रुटी असल्याने हे शेतकरी अद्यापही पीएम किसानच्या लाभापासून वंचित आहेत. प्रशासनाने या शेतकऱ्यांची यादी तयार केली असून, या शेतकऱ्यांना तातडीने अचूक आधार क्रमांक, आधारकार्डवरील नाव, बँकेच्या आयएफएससी कोड तातडीने सादर करण्याचे आवाहन केले आहे.
-----------
तहसील कार्यालयात माहितीचे संकलन
विविध त्रुटींमुळे पीएम किसानच्या लाभापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची यादी डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यूडॉटवाशिमडॉटगव्हडॉटइन या संकेतस्थळावर जिल्हा प्रशासनाने उपलब्ध केली असून, या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांना तहसीलस्तरावर अचूक माहिती सादर करण्याचे आवाहन केले आहे. त्यात आधारकार्ड, बँक पासबूकची झेरॉक्स, पासबूकच्या प्रतीवर लाभार्थ्यांची स्वाक्षरी व कागदपत्रांवर पूर्ण पत्ता टाकणे आवश्यक आहे.
---------------
पीएम किसानचे जिल्ह्यातील लाभार्थी
तालुका शेतकरी त्रुटी असलेले
वाशिम- ३६७१२ ९९३
मालेगाव- ३२४६५ ६१५
रिसोड- ३५४२७ ४७८
मं.पीर- ३२६४६ ३८३
मानोरा- २७४८५ २०६
कारंजा- ३४००८ ४७८
---------------------------
एकूण- १९८७४३ ३१५३