शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

वाशिम जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांसाठी ३१ पोकलेनचे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 1:28 PM

कठीण खडक असल्याने खोदकाम करण्यासाठी पोकलेनची आवश्यकता असल्याने बीजेएसच्यावतीने पोकलेन मशीनसाठी प्रस्ताव मागण्यात आले होते.

निवड प्रक्रिया: खोदकामाची समस्या सुटणार वाशिम: जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) पुढाकारातून जलसंधारणाची कामे करण्यात येत आहेत. जिल्ह्याचा भूस्तर पाहता काही ठिकाणी कठीण खडक असल्याने खोदकाम करण्यासाठी पोकलेनची आवश्यकता असल्याने बीजेएसच्यावतीने पोकलेन मशीनसाठी प्रस्ताव मागण्यात आले होते. या अंतर्गत बीजेएसच्या जिल्हा व्यवस्थापक कार्यालयाकडे ३१ अर्ज प्राप्त झाले आहेत. जिल्हा प्रशासनाने बीजेएसच्या जिल्हा समन्वयकांना २२ नोव्हेंबर रोजी पत्र पाठवून जिल्ह्यासाठी ३० पोकलेन मशीन उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. राज्यशासन आणि बीजेएसच्या पुढाकाराने जिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नाला खोलीकरण, शेततळे, वनतळे, खोल समतल चरसह नदी खोलीकरणही करण्यात येत आहे. कृषी विभागासह पाटबंधारे विभाग आणि महसूल विभागाच्यावतीने ही कामे करण्यात येत असून, कामांसाठी ग्रामपंचायतींचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात रिसोड वगळता वाशिम, मानोरा, मंगरुळपीर, कारंजा आणि मालेगाव या पाचही तालुक्यात ही कामे वेगाने करण्यात येत आहेत. जिल्ह्यात या कामांसाठी बीजेएसने २८ जेसीबी मशीनही उपलब्ध केल्या आहेत. तथापि, जिल्ह्यातील जमिनीत पाच ते सहा फुटानंतर कठीण खडक लागतो. सुजलाम, सुफलाम अंतर्गत करण्यात येणारे खोल सलग समतल चर, शेततळे, वनतळे, नाला खोलीकरण आदिंसह इतर कामांसठी पोकलेनची आवश्यकता होती. पोकलेनअभावी निर्माण झालेली अडचण दूर करण्यासाठी  जिल्हा प्रशासनाने बीजेएसचे जिल्हा समन्वयक शिखरचंद बागरेचा यांना २२ नोव्हेंबर रोजी पत्र सादर करून  ३० पोकलेन मशीन उपलब्ध करण्याची मागणी केली होती. आता वाशिम जिल्ह्यासह विविध जिल्ह्यातून ३१ पोकलेन मशीनचे प्रस्ताव बीजेएसच्या जिल्हा व्यवस्थापकांकडे आले असून, या अर्जांना मंजुरी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्यातील रखडलेली खोदकामे मार्गी लागणार आहेत. जिल्ह्यातील मशीनधारकांचा अल्प प्रतिसादसुजलाम, सुफलाम अंतर्गत जलसंधारणाची कामे करण्यासाठी पोकलेन आवश्यक असल्याने बीजेएसकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. बीजेएसच्या आवाहनाला बीड, गेवराई, पुणे, बारामती, नंदूरबार आदि लांबवरच्या जिल्ह्यातील पोकलेनधारकांनी वाशिम जिल्ह्यात मशीन देण्यास उत्सुकता दर्शविली; परंतु वाशिम जिल्ह्यातील पोकलेनधारकांकडून मात्र केवळ दोनच प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. विशेष म्हणजे या कामांसाठी जिल्ह्यातील पोकलेनधारकांना प्राधान्य देण्याचे बीजेएसने ठरविले आहे.

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा