३00 युवकांचे रक्तदान
By Admin | Updated: August 19, 2014 00:11 IST2014-08-19T00:11:32+5:302014-08-19T00:11:32+5:30
रक्तदान शिबिर ३00 दात्यांनी रक्तदान केले.

३00 युवकांचे रक्तदान
वाशिम : वाशिम व किन्हीराजा येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिर ३00 दात्यांनी रक्तदान केले. या कामी आरोग्य विभागाच्या अधिकारी-कर्मचार्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
किन्हीराजा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भीमराज्य मित्र मंडळाच्यावतीने रवी तायडे यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या रक्तदान शिबिरात १३ युवकांनी रक्तदान दिले. यामध्ये लखन जाधव रामराववाडी चंद्रकांत तायडे उत्तम तायडे, अतिष घुगे, रणजित घुगे, पंकज तायडे, विशाल वानखेडे, सुमेध कांबळे, शिवाजी घुगे, विवेक तायडे, रणजित तायडे, नागेश पट्टेबहादूर, इत्यादी युवकांनी रक्त देऊन या शिबिराला योगदान दिले या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.एन.आर.थोरात, वैजनाथ आप्पा गोंडाळ, डॉ.जगदीशराव घुगे, सरपंचा वत्सलाबाई तायडे, उपसरपंच रविंद्र तायडे, ग्रा.प.सदस्य अशोकराव नालींदे, तंटामुक्तीचे अध्यक्ष मोतीराम कदम, अल्लाउद्दीन कुरेशी, सुखेदव जामकर, गजाननराव घुगे, उध्दवराव घुगे, वसंता जाधव, नारायणराव घुगे, भिकासिंग राठोड, बशिर शहा, इत्यदी मान्यवरांच्या उपस्थितीत या रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. या शिबिराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय व रक्तपेढी अधिकारी व कर्मचारी रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. गिरीष के.चव्हाण, रक्तपेढी तत्रज्ञ एस.व्ही.चौधरी रक्तपेढी तत्रज्ञ डि.एस.लाड, जनसंपर्क अधिकारी एस.दंडे, रक्तपेढी परिचर डहाळे, वाहनचालक इत्यादी मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर घेण्यात आले. हे शिबिर यशस्वी करण्याकरिता भिमराज्य मित्र मंडळाचे जनार्धन तायडे, अशोक तायडे, सुधाकर तायडे, पुंडलीक तायडे, केशव सदाशिव बाळू तायडे, इत्यादी कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.
वाशिम : स्थानिक विठ्ठलवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. फॅन्स क्लबच्यावतीने आयोजित सदर रक्तदान शिबिरात २८७ लोकांनी रक्तदान करुन राष्ट्रीय कार्यात आपला सहभाग नोंदविला. वाशिम शहरातील ५५ वर्षीय रक्तदाते किशोर केला यांनी ७३ व्या वेळी रक्तदान करुन या रक्तददान शिबिराची सुरुवात केली याप्रसंगी जिल्हा सामान्य रुग्णालयात १४ ऑगस्टलाच रुजु झालेल्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुरेश मेंढे, यांच्या सह डॉ.क्षिरसागर, डॉ.सिसोदीया, रक्तसंग्राहक चौधरी, व चव्हाण तसेच फॅन्सचे पदाधिकारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी किशोर केला. यांच्यासह अँड.सुरेश टेकाळे, अनिल घुनागे, रवि पेंढारकर, सागर रावळे, धनंजय रणखांब, व मोठया संख्येत विद्यार्थी, युवक युवती असे एकूण २८७ लोकांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिरात गोळा झालेल्या २८७ बॅगा पैकी हेडगेवार रक्तपेढी अकोला यांना १४५ बॅग, जिल्हा सामान्य रुग्णालयास १0१ बॅग, व डाळे रक्तपेढी वाशिम यांना ४१ बॅग देण्यात आल्या. यामध्ये तामसी, कळंबा, देपूळ, वांगी, अनसिंग, काटा, अडोळी, उकळी, शेलु खुर्द, मोहजा तांदळी, तोंडगाव, जय जिजाऊ मंडळ, तसेच मंगरुळ, कारंजा, मालेगाव, वाशिम येथील तरुणांनी रक्तदान केले. याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेखा मेंढे यांनी रक्तदाते किशोर केला, अनिल घुनागे, व सागर रावळे यांचा पुष्पगुच्छ व सन्मान पत्र प्रदान करुन सत्कार केला.