दुर्धर आजारग्रस्तांचे २७ प्रस्ताव मंजूर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:28 IST2021-02-05T09:28:38+5:302021-02-05T09:28:38+5:30
ग्रामीण भागातील हृदयरोग, किडनी व कर्करोग आदी दुर्धर आजाराने पीडित लाभार्थ्यांना औषधोपचाराकरिता अर्थसाहाय्य मिळावे म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे ...

दुर्धर आजारग्रस्तांचे २७ प्रस्ताव मंजूर !
ग्रामीण भागातील हृदयरोग, किडनी व कर्करोग आदी दुर्धर आजाराने पीडित लाभार्थ्यांना औषधोपचाराकरिता अर्थसाहाय्य मिळावे म्हणून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे १५ हजाराची तरतूद केली जाते. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर लाभार्थींचे प्रस्ताव स्वीकारण्यात येतात. एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत ३१ प्रस्ताव प्राप्त झाले. प्राप्त प्रस्तावांच्या छाननीसाठी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची सभा २ फेब्रुवारी रोजी घेतली. यावेळी समितीचे सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तुषार मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची उपस्थिती होती. या सभेत प्राप्त् ३१ प्रस्तावांपैकी २७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले तर निकषात न बसल्याने चार प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले. २७ दुर्धर आजारग्रस्तांना प्र्रत्येकी १५ हजार रुपये अर्थसाहाय्य मंजूर केले असून, एकूण चार लाख पाच हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील दुर्धर आजाराने पीडित असलेल्या लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रस्ताव नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करावे, असे आवाहन जि.प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी केले.
बॉक्स
एकूण प्रस्ताव ३१
मंजूर प्रस्ताव २७
नामंजूर प्रस्ताव ०४