शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

वाशिम जिल्ह्यातील बॅरेजेस परिसरातील वीज सुविधांसाठी मिळाले २५ कोटी रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 5:28 PM

वाशिम : आमदार राजेंद्र पाटणी यांनीही शासनदरबारी प्रयत्न केल्याने अखेर बॅरेजेस परिसरात वीज सुविधा उभारण्यासाठी जलसंपदाने २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सदर रकमेचा धनादेश ५ एप्रिल रोजी महावितरणकडे सुपूर्द केला. 

ठळक मुद्देमहावितरणने बॅरेजेस परिसरातील वीज सुविधा उभारण्याकरिता ९२ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचा सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविला होता.आमदार राजेंद्र पाटणी यांनी याकामी पुढाकार घेवून जलसंपदा विभागाने निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी पाठपुरावा केला.५ एप्रिल रोजी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता मांदळे यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता व्ही.बी.बेथारिया यांच्याकडे २५ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. .

वाशिम : ७०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खर्चून जिल्ह्यातील पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारण्यात आले. यामुळे कधीकाळी परजिल्ह्यात वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवून ठेवणे शक्य झाले. मात्र, बॅरेजेस परिसरात विजेची सुविधा नसल्याने उपलब्ध पाणी सिंचनासाठी वापरता येणे अशक्य झाले होते. याप्रकरणी ‘लोकमत’ने विविधांगी वृत्तांच्या माध्यमातून सलग पाठपुरावा केला. याशिवाय आमदार राजेंद्र पाटणी यांनीही शासनदरबारी प्रयत्न केल्याने अखेर बॅरेजेस परिसरात वीज सुविधा उभारण्यासाठी जलसंपदाने २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून सदर रकमेचा धनादेश ५ एप्रिल रोजी महावितरणकडे सुपूर्द केला. वाशिम जिल्ह्यातील अधिकांश शेती क्षेत्र कोरडवाहू असल्याने जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पिकांवरच अवलंबून आहेत. सिंचनाचा अनुशेषही मोठ्या प्रमाणात असल्याने फळपिके, भाजीपाला यासह बागायती क्षेत्राचे प्रमाण नगण्य आहे. ही बाब लक्षात घेवून राज्यशासनाने पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी बॅरेजेस उभारले. मात्र, त्यातील पाणी वापरण्याकरिता लागणारी वीज उपलब्ध नव्हती. मध्यंतरी महावितरणने बॅरेजेस परिसरातील वीज सुविधा उभारण्याकरिता ९२ कोटी रुपयांचा निधी अपेक्षित असल्याचा सविस्तर अहवाल शासनाकडे पाठविला होता. मात्र, निधी नेमका कुणी द्यायचा, यावर एकमत होत नव्हती. आमदार राजेंद्र पाटणी यांनी याकामी पुढाकार घेवून जलसंपदा विभागाने निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे हा प्रश्न निकाली निघला असून ५ एप्रिल रोजी आमदार पाटणी यांच्या प्रमुख उपस्थितीत जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता मांदळे, कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता व्ही.बी.बेथारिया, कार्यकारी अभियंता तायडे यांच्याकडे २५ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण