शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १४ दिवसांत आढळले २५ कोरोना रुग्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:51 IST

वाशिम : सप्टेंबर महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत कोरोनाचा आलेख आणखी घसरला असून, गत १४ दिवसांत जिल्ह्यात २५ रुग्ण आढळले. यामुळे जिल्हावासीयांना ...

वाशिम : सप्टेंबर महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत कोरोनाचा आलेख आणखी घसरला असून, गत १४ दिवसांत जिल्ह्यात २५ रुग्ण आढळले. यामुळे जिल्हावासीयांना मोठा दिलासा मिळत आहे.

जिल्ह्यात ३ एप्रिल २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. दुसऱ्या लाटेत जनजीवन प्रभावित झाले होते. जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या वाशिम शहरात गतवर्षी जून महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. पहिल्या लाटेत एप्रिल ते ऑक्टोबर या दरम्यान इतर शहरांच्या तुलनते वाशिम शहरात अधिक संख्येने रुग्ण आढळले होते. दुसऱ्या लाटेत मार्च ते मे २०२१ या कालावधीत वाशिम शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली होती. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडसाठी वेटिंगवर राहण्याची वेळ रुग्णांवर आली होती. जून महिन्यापासून कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. सप्टेंबर महिन्यात यामध्ये आणखी घट येत असल्याचे दिसून येते. १ ते १४ सप्टेंबर या १४ दिवसांत जिल्ह्यात २५ कोरोना रुग्ण आढळून आले. या दरम्यान कोरोनामुळे एकही मृत्यू नसल्याने जिल्हावासीयांची चिंता बऱ्याच अंशी कमी होत आहे. जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे कोरोना स्थिती नियंत्रणात असल्याचे दिसून येते.

००००

बॉक्स

कोरोनाविषयक नियमांचे पालन आवश्यक

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही. नागरिकांनी यापुढेही कोरोनाविषयक नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे. कोरोनाला रोखण्यासाठी नागरिकांनी बाजारपेठेत गर्दी करू नये, मास्कचा वापर आणि हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचे पालन करणे आवश्यक आहे.

०००००००००००० ०००००००००००

कोट

जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत आहे, ही बाब दिलासादायक आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होत आहे; परंतु धोका अद्याप टळलेला नाही. कोरोलाला रोखण्यासाठी यापुढेही नागरिकांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.

- डॉ. अविनाश आहेर, जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम