शिरपूर येथे शेतकरी चेतना केंद्रासाठी २४.६८ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:21 IST2021-02-05T09:21:59+5:302021-02-05T09:21:59+5:30
शेतकऱ्यांना गावातच विविध शेतीविषयक प्रशिक्षण, योजनांची माहिती व मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने जिल्ह्यात कृषी विभागाच्या पुढाकाराने नावीन्यपूर्ण योजना म्हणून ...

शिरपूर येथे शेतकरी चेतना केंद्रासाठी २४.६८ लाख
शेतकऱ्यांना गावातच विविध शेतीविषयक प्रशिक्षण, योजनांची माहिती व मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने जिल्ह्यात कृषी विभागाच्या पुढाकाराने नावीन्यपूर्ण योजना म्हणून १० ठिकाणी शेतकरी चेतना केंद्र उभारले जाणार आहेत. त्यात जिल्हास्तरावर एक, तर ग्रामपातळीवर ९ केंद्र उभारले जाणार आहेत. यात शिरपूर येथेही शेतकरी चेतना केंद्र प्रस्तावित आहे. या चेतना केंद्राची उभारणी लवकर व्हावी आणि शेतकऱ्यांना सुविधा व्हावी, म्हणून आमदार अमित झनक यांनी पुढाकार घेऊन शासनाकडे पाठपुरावा करीत २४ लाख ६८ हजार रुपयांचा निधी मंजूर करून घेतला आहे. या चेतना केंद्राची उभारणी सार्वजनिक बांधकाम विभाग वाशिमकडून केली जाणार असून, यासाठी १ ते १५ फेब्रुवारीदरम्यान निविदा मागविल्या जाणार आहेत. या निविदा १७ फेब्रुवारी रोजी उघडल्या जातील.
---------------
क्रीडांगणाच्या कुंपणासाठी ८.४८
आमदार अमित झनक यांच्या पुढाकारातून शिरपूर जैन येथे शेतकरी चेतना केंद्राच्या निर्मितीसाठी २४ लाख ६८ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहेच, शिवाय येथील शासकीय क्रीडांगणाच्या सुरक्षेसह अतिक्रमण नियंत्रणाकरिता कुंपण उभारण्यासाठी ८ लाख ७८ हजार रुपयांचा निधीही उपलब्ध झाला आहे. यामुळे पुढे क्रीडांगणाचा विकास करण्यासही मदत होणार आहे.