ठिबक सिंचनाचे २४ हजार रुपयांचे पाइप चोरी
By Admin | Updated: April 16, 2015 01:28 IST2015-04-16T01:28:20+5:302015-04-16T01:28:20+5:30
मालेगाव तालुक्यातील प्रकार.

ठिबक सिंचनाचे २४ हजार रुपयांचे पाइप चोरी
मालेगाव (जि. वाशिम) : मालेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ग्राम मुंगळा येथील शेतशिवारातून सहा बंडल ठिबक पाइप चोरी झाल्याची घटना १0 एप्रिल रोजी घडली. २४ हजार ६00 रुपये किमतीचे असलेले पाइप अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार १५ एप्रिल रोजी पुरुषोत्तम नंदकिशोर शर्मा यांनी मालेगाव पोलीस स्टेशनला दिली आहे. शर्मा यांच्या तक्रारीवरून मालेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल झाला. पुढील तपास बीट जमादार दामोदर इप्पर हे करीत आहेत.