कारंजा तालुक्यात आढळले २४ कोरोना रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:29 IST2021-05-31T04:29:14+5:302021-05-31T04:29:14+5:30
००० हिंगोली मार्गावरील वाहतूक ठप्प वाशिम : शहरातील वाशिम-हिंगोली रस्त्यावर रविवारी दुपारी २ ते २.३० वाजेच्या सुमारास वाहतूक जागीच ...

कारंजा तालुक्यात आढळले २४ कोरोना रुग्ण
०००
हिंगोली मार्गावरील वाहतूक ठप्प
वाशिम : शहरातील वाशिम-हिंगोली रस्त्यावर रविवारी दुपारी २ ते २.३० वाजेच्या सुमारास वाहतूक जागीच ठप्प झाल्याचे दिसून आले. जलकुंभानजीकचे रेल्वेगेट बंद असल्याने हा प्रकार घडला.
00000000000000
शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सकाळी ११ वाजेनंतर दुकाने सुरू ठेवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यानुषंगाने विशेष ‘वॉच’ ठेवला जात असून शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात असल्याचे दिसून येत आहे.
0000000000000
लाडेगाव येथे आरोग्य तपासणी
वाशिम : लाडेगाव येथील आणखी चार जणांचा कोरोना चाचणी अहवाल रविवार, ३० मे रोजी पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध रुग्णांची तपासणी केली असून, लवकरच त्यांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले.
००००००
वाहनचालकांवर पोलिसांची कारवाई
वाशिम : येथून मालेगावकडे जाणाऱ्या मार्गावर असलेल्या अमानी महामार्ग पोलीस केंद्राकडे स्पीड गन व्हॅन उपलब्ध असून त्याव्दारे गत दोन दिवसांत नियम न पाळणाऱ्या १८ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
००००