चिखली व रिठद तीर्थक्षेत्रासाठी २.२५ कोटी मंजूर

By Admin | Updated: April 2, 2016 01:20 IST2016-04-02T01:20:51+5:302016-04-02T01:20:51+5:30

ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत २.२५ कोटींचा निधी.

2.25 crore approved for Chikhali and Rithad pilgrimage | चिखली व रिठद तीर्थक्षेत्रासाठी २.२५ कोटी मंजूर

चिखली व रिठद तीर्थक्षेत्रासाठी २.२५ कोटी मंजूर

वाशिम : ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत जिल्ह्यातील श्रीसंत झोलेबाबा चिखली व श्रीसंत गजानन महाराज रिठद या ह्यबह्ण वर्ग तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्याच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने २.२५ कोटींचा निधी २८ मार्चला मंजूर केला असून, सद्यस्थितीत ५९.६१ लाखांचा निधी जिल्हा परिषदेला वितरित केला आहे. ब वर्ग ग्रामीण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी विविध विकास कामांकरिता निधी उपलब्ध करुन देण्याबाबत जि.प. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. चिखली येथील तीर्थक्षेत्रासाठी दोन कोटी आणि रिठद येथील तीर्थक्षेत्रासाठी २५ लाख रुपये मंजूर झाले. यापैकी चिखलीसाठी ३४.६१ लाख व रिठदसाठी २५ लाख रुपये निधी शासनाने वितरित केला आहे. या निधीतून तीर्थक्षेत्रांमध्ये भक्तनिवास, सभागृह व अन्य सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.

Web Title: 2.25 crore approved for Chikhali and Rithad pilgrimage