परराज्य, महानगरात  गेलेले २२ हजार कामगार वाशिम जिल्ह्यात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 10:49 AM2020-05-19T10:49:50+5:302020-05-19T10:50:03+5:30

परराज्यात, महानगरात गेलेले वाशिम जिल्ह्यातील मजूर, कामगार आता जिल्ह्यात परतत असून, त्यांची आरोग्य तपासणी करण्याची मोहिम आरोग्य विभागाने उघडली आहे.

22,000 migrant workers enter Washim district | परराज्य, महानगरात  गेलेले २२ हजार कामगार वाशिम जिल्ह्यात दाखल

परराज्य, महानगरात  गेलेले २२ हजार कामगार वाशिम जिल्ह्यात दाखल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरत असल्याने विविध कारणास्तव परराज्यात, महानगरात गेलेले वाशिम जिल्ह्यातील मजूर, कामगार आता जिल्ह्यात परतत असून, त्यांची आरोग्य तपासणी करण्याची मोहिम आरोग्य विभागाने उघडली आहे. दरम्यान, अधिकृत परवानगी घेऊन जवळपास ४ हजार कामगार, मजूर जिल्ह्यात दाखल झाले तर उर्वरीत १८ हजार मजूर, कामगार हे छुप्या मार्गाने दाखल झाल्याचे आरोग्य तपासणी मोहिमेवरून दिसून येते.
जिल्ह्यात रोजगारांचे स्त्रोत अपुरे असल्याने प्रामुख्याने शेती कामांवरच जिल्ह्यातील बहुतांश जनतेच्या संसाराचा गाडा चालतो. त्यातही जिल्ह्यात प्रामुख्याने कोरडवाहू शेतीचे प्रमाण अधिक असल्याने खरीप हंगामानंतरच जिल्हाभरातील हजारो कामगार रोजगाराच्या शोधात मुंबई, पुणे आदी महानगरांसह गुजरात, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेशात जातात. कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमीवर लॉकडाऊन व संचारबंदी लागण्यापूर्वी परजिल्हा, परराज्यात गेलेले जिल्ह्यातील २७ हजार ५०९ नागरिक जिल्ह्यात परतले होते. १० दिवसांपूर्वी लॉकडाऊनच्या कालावधीतही परजिल्ह्यात अडकलेल्या मजुर, कामगारांना स्वजिल्ह्यात जाण्याची परवानगी मिळाली. त्यानुसार जिल्ह्यात १७ मे पर्यंत २२ हजार ४५२ कामगार, मजूर परतले असून, या सर्वांची आरोग्य तपासणी केली जात आहे.


तपासणी करताना सावधगिरी
डेंजर झोनमधून येणाऱ्या मजुरांची आरोग्य तपासणी करताना आरोग्य विभागातर्फे योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर कर्मचाऱ्यांसाठी विशेष सुरक्षा किटचा अभाव असल्याने कर्मचारही दक्षता घेऊनच तपासणी करीत आहेत.


सर्वांची प्रकृती ठणठणीत
आरोग्य विभागातर्फे आतापर्यंत १८ हजार नागरिकांची तपासणी पूर्ण झाली असून, यापैकी तुर्तास तरी कुणाला कोणतीही लक्षणे आढळली नाहीत.

Web Title: 22,000 migrant workers enter Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.