२२ हजार विद्यार्थी शुल्क माफीपासून वंचित

By Admin | Updated: October 25, 2016 02:32 IST2016-10-25T02:32:44+5:302016-10-25T02:32:44+5:30

विद्यार्थ्यांचे खातेक्रमांक अप्राप्त; शासनाकडे यादीच सादर झाली नाही; दुष्काळी मदत ठरतेय ‘तकलादू’.

22 thousand students are deprived of fee waiver | २२ हजार विद्यार्थी शुल्क माफीपासून वंचित

२२ हजार विद्यार्थी शुल्क माफीपासून वंचित

वाशिम, दि. २४- दुष्काळग्रस्त वाशिम जिल्ह्यातील दहावी व बारावीची परीक्षा देणार्‍या सुमारे २२ हजार विद्यार्थ्यांंच्या परीक्षा शुल्काचा परतावा अद्याप मिळालेला नाही. वारंवार मागणी करूनही काही शाळांनी विद्यार्थ्यांंचे खातेक्रमांक कळविले नसल्यामुळेच हा प्रश्न उद्भवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
५0 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांंचे परीक्षा शुल्क माफ करण्यासोबतच अन्य प्रकारच्या सवलती दिल्या जातात. जिल्ह्यातील सर्व गावांची सन २0१५-१६ च्या खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आली होती. खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी ५0 पैशांपेक्षा कमी आलेल्या गावांना शासनाने २३ मार्च २0१६ रोजीच्या शासन निर्णयानुसार विविध सवलती जाहीर केल्या. त्यात जमीन महसुलात सवलत, वीज बिलात ३३.५ टक्के सवलत, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी, आदींचा समावेश आहे.
या निर्णयानुसार दहावी, बारावी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ झालेले आहे. वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून विलंबाने जाहीर झाला. तोपर्यंत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्काचा भरणा केला होता. परीक्षा शुल्काचा भरणा केलेल्या विद्यार्थ्यांना सदर शुल्क परत मिळणे अनिवार्य आहे.

Web Title: 22 thousand students are deprived of fee waiver