२२ शिक्षकांची आंतरजिल्हा बदली

By Admin | Updated: September 2, 2016 01:18 IST2016-09-02T01:18:48+5:302016-09-02T01:18:48+5:30

वाशिम जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांवरील २२ शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या झाल्या.

22 teacher interchanges | २२ शिक्षकांची आंतरजिल्हा बदली

२२ शिक्षकांची आंतरजिल्हा बदली

वाशिम, दि. १ : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांवरील २२ शिक्षकांच्या यावर्षी आपसी आंतरजिल्हा बदल्या झाल्या असून, संबंधित शिक्षक त्या-त्या शाळेवर रुजू झाले आहेत. गत काही वर्षांंपासून पती-पत्नी एकत्रीकरण, आंतरजिल्हा बदली प्रकरणाला स्थगिती असल्याने शिक्षकांचा हिरमोड झाला आहे. एका जिल्ह्यातून दुसर्‍या जिल्ह्यात बदलून जाण्यासाठी तसेच दुसर्‍या जिल्ह्यातून स्वजिल्ह्यात बदलून येण्यासाठी इच्छुक शिक्षकांना आपसी बदलीसाठी दुसर्‍या शिक्षकाचा शोध घ्यावा लागतो. परस्पर समन्वयातून आपसी बदलीसाठी पात्र उमेदवार मिळाल्यानंतर आपसी बदलीचा प्रस्ताव सादर केला जातो. यावर्षी वाशिम जिल्ह्यातून परजिल्ह्यात आणि परजिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यातील शाळांवर रुजू होणार्‍या शिक्षकांची संख्या २२ च्या आसपास आहे. २२ शिक्षकांच्या आपसी आंतरजिल्हा बदल्या झाल्या असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.

Web Title: 22 teacher interchanges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.